NND19KJP02.jpg
NND19KJP02.jpg 
मराठवाडा

नागरिकांनी काळजी न करता खबरदारी घ्यावी.....कोण म्हणाले ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही. तरीही नागरिकांनी या आजाराबाबत काळजी न करता खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. १९) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. या वेळी ते बोलत होते. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत घेतला आढावा
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, मनपाचे उपायुक्त विलास भोसीकर आदींची उपस्थिती होती. 

खबरदारीच्या सुचना 
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाबाबत खबरदारीच्या उपाययोजनेच्या अनेक सूचना केल्या. जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करणे, सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह, जलतरणिका, व्यायाम शाळा, नाट्यगृह, शॉपिंग मॉल, खासगी शिकवणी, अभ्यासिका केंद्र, आठवडे बाजार, कार्यालयीन बैठकांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली. 

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी
बँक, पोष्ट ऑफिस, एटीएममधील ग्राहकांची गर्दी नियंत्रित करणे, आधार केंद्र बंद ठेवणे, सर्व धार्मिक स्थळांवरील भाविकांची गर्दी कमी करणे, तूर, चना, कापूस खरेदी केंद्रावरील नागरिकांची गर्दी नियंत्रित करणे, सर्व प्रकारचे हॉटेल्स, परमीट रूम, बेकरी, स्वीट मार्ट, चॅट भांडार, ढाबा आदी सार्वजनिक ठिकाणच्या प्रतिष्ठाणांवरील गर्दी नियंत्रित करतानाच या ठिकाणच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष पुरविण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. त्यासोबतच प्रशासनाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी पाहणी पथक निर्माण करण्यात यावे, असे आदेश त्यांनी या वेळी दिले.

शंभर खाटांचे विलगीकरण कक्ष
कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नांदेड शहरासह सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आल्याचे या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नांदेड शहरात शंभर खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT