गोजेगाव ः औंढा तालुक्‍यातील गोजेगाव येथे थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून उब घेतली जात आहे. 
मराठवाडा

हिंगोली जिल्‍ह्यात थंडीचा जोर वाढला

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्‍ह्यात मागच्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने शेकोट्या पेटवून उब घेतली जात आहे. परंतु, सतत बदलत असलेल्या वातावरणाचा रब्‍बीच्या पिकावर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सोमवारी (ता.१०) दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

मागच्या आठड्यापासून वातावरणात बदल सुरू आहे. कधी धुके तर कधी ढगाळ वातावरण राहत आहे. दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने अंगावरून काढून टाकेलेले स्‍वेटर परत अंगावर घातले जात आहेत. शहरी भागापासून ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळ व सायंकाळच्या वेळी उब घेतली जात आहे. या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण देखील वाढले असून शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात या आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

गहु पिकावर तांबारा
सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे गहू, हरभरा, ज्‍वारी या रब्‍बीतील पिकावर परिणाम होत आहे. हरभरा पिकावर वातावरणामुळे पिवळा रंग येवून नंतर पांढरा रंग येत आहे. तसेच त्‍यावर अळीचा देखील प्रादुर्भाव झाला आहे. तर गहु पिकावर तांबारा पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पिकांचे उत्‍पन्न घटण्याचा अंदाज
जिल्‍ह्यात ९२६८४ हेक्‍टरवर हरभऱ्याचे तर २६६२४ हेक्‍टरवर गव्हाचे पिक आहे. सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे पिकावर होत असलेल्या या परिणामामुळे पिकांचे उत्‍पन्न घटणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

वातावरणाचा उत्‍पन्नावर परिणाम होइल
यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने खरीपातील पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी पडलेल्या पाण्यामुळे विहिरी व विंधन विहिरीच्या पाणीपातळीत झालेली वाढ तसेच जमिनीतील ओलाव्यामुळे रब्‍बीचे क्षेत्र वाढविले आहे. खरीपातील नुकसान भरपाई रब्‍बीच्या पिकात होईल असा अंदाज बांधला होता. मात्र, बदलत असलेल्या वातावरणाचा उत्‍पन्नावर परिणाम होणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे. सध्या शहरासह जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम शेती कामावर सुध्दा होत आहे. 

वातावरण ठरतेय धोकादायक 
यावर्षी परतीच्या पावसाने खरीपाचे नुकसान झाले. त्‍यामुळे रब्‍बीचे क्षेत्र वाढविले आहे. पिकाचा चांगली वाढ झाली आहे, मात्र सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे पिकावर त्‍याचा परिणाम होत आहे. सध्या वाढलेली थंडी पिकासाठी चांगली आहे. मात्र, दोन दिवसानंतर परत वातावरण बदलत असल्याचे पिकासाठी ते धोकादायक ठरत आहे. - प्रल्‍हाद काळे, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Mhatre: महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! नगरसेवक रमेश म्हात्रेंना अखेर अटक; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई

Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार? BJP आणि NCP च्या दोन बड्या नेत्यांमध्ये भेट; नव्या समीकरणांची चर्चा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची टीम आली अन् स्वीट होममध्ये आढळला मृत उंदीर; तात्काळ परवाना रद्द, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

जुई गडकरीने सुरू केलं नवं काम; अभिनयासोबत आता 'या' नव्या प्रवासालाही केली सुरुवात

Latest Marathi News Live Update: वेळ नदीला महापूर, पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाहतूककोंडी

SCROLL FOR NEXT