file photo
file photo 
मराठवाडा

कॉंग्रेसचे नगरसेवक सहलीवर!

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महापौर-उपमहापौर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना दगाफटका होऊ नये म्हणून कॉंग्रेस पक्षाचे बहुतांश नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत काही विरोधी गोटाचे नगरसेवकदेखील असल्याची माहिती आहे.

परभणी महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी सोमवारी (ता.१८) कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. महापौरपदासाठी अनिता रवींद्र सोनकांबळे (कॉंग्रेस), डॉ. वर्षा संजय खिल्लारे (राष्ट्रवादी), मंगला अनिल मुदगलकर (भाजप), श्रीमती गवळण रामचंद्र रोडे (राष्ट्रवादी) यांनी, तर उपमहापौरपदासाठी भगवान वाघमारे (कॉंग्रेस), खान महेमूद अब्दुल मजिद (कॉंग्रेस), एसएमएस अली पाशा (राष्ट्रवादी), अलीखान मोईनखान (राष्ट्रवादी) व मोकिंद खिल्लारे (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

कॉंग्रेस पक्षाने घेतली खबरदारी
परभणी विधानसभा निवडणुकीत महापालिकेच्या अनेक नगरसेवकांनी खुलेआमपणे पक्षीय उमेदवारांच्या विरोधात कामे केली. कोणता नगरसेवक कुणाचे काम करीत हेही समजून येत नव्हते. अद्यापही अनेक जण त्या धुंदीतून बाहेरदेखील आले नाहीत. महारौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत स्वपक्षाच्या उमेदवाराला दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारीची उपाययोजना म्हणून मंगळवारी (ता. १९) आपल्या बहुतांश नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यासोबतच विरोधी पक्षाचे काही नगरसेवक गळाला लागल्याचीदेखील माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग...
आघाडी, महाशिवआघाडीची शक्यता धुसर झाल्याने राष्ट्रवादीनेदेखील संख्याबळ जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची माहिती आहे. अन्यपक्षीय सदस्यांशी सत्तेच्या वाटाघाटी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज भरताना एक-दोन सदस्यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीचे सर्व सदस्यांनी एकीचे दर्शन घडविले होते. त्यामुळे ३३ जा मॅजिक फिगर गाठण्यासाठी राष्ट्रवादीदेखील प्रयत्नशील आहे. त्यामुळे तेदेखील आपल्या सदस्यांना सहलीवर पाठविणार असल्याची माहिती आहे.

संख्याबळासाठी ३३ चा मॅजिक फिगर
महापालिकेत सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचे ३०, राष्ट्रवादी कॉंग्रेस १९, भारतीय जनता पक्ष आठ, शिवसेना पाच, अपक्ष दोन व ‘एमआयएम’चा एक सदस्य आहे. दुरंगी लढत झाल्यास ३३ चा मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोन्ही पक्षांचे उमेदवार विविध गटा- तटांना तसेच अन्य पक्षीय सदस्यांना जोडण्याचा निश्चित प्रयत्न करतील. कॉंग्रेसचा कल तिरंगी लढतीकडे, तर राष्ट्रवादीचा कल दुरंगी लढत व्हावी, यासाठी असेल.

भाजप, शिवसेनेची भूमिका महत्त्वाची...
महापौर-उपमहापौरपदासाठी दुरंगी लढत झाली तर भाजपसह शिवसेनेची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. भाजपची निवडणुकीत उतरण्याची किंवा तटस्थतेची भूमिका, तसेच शिवसेनेची तटस्थ राहण्याची भूमिका कॉंग्रेससाठी सहाय्यक राहणार, तर सत्ताधाऱ्यांना मतदानातून विरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादीसाठी पूरक ठरणार आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT