aurangabad
aurangabad 
मराठवाडा

दहावी, बारावीचा "कॉपी पॅटर्न' 

संदीप लांडगे

औरंगाबाद : "अरेऽऽऽ पाचव्या प्रश्‍नाचे उत्तर पाठवले! पथक आले रेऽऽऽ, सर, एवढी कॉफी नेऊन देता का?' असे विविध वाद-संवाद सध्या बारावी, दहावी परीक्षेच्या केंद्रांबाहेर ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरून कॉपी पुरविणाऱ्यांनाच जास्त काळजी पडलेली दिसत आहे. भरारी पथक आले असे कुणी ओरडले तरी खिडक्‍यांतून कॉपींचा पाऊस पडत आहे. त्यामुळे परीक्षेला आठ आणि मदतीला साठ अशी परिस्थिती बहुतांश केंद्रावर पाहायला मिळत आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश परीक्षा केंद्रांवर सुरू असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत सर्वच केंद्रांवर कॉपीचा शिमगा होत असून, केंद्राभोवती जत्रेचे स्वरूप दिसून येत आहे. विद्येची देवी मानल्या जाणाऱ्या पुस्तकांचे काम झाल्यानंतर सर्रास होळी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. पुस्तक सर्रास खिडक्‍यांवर भिरकाविले जात आहेत. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यासाठी बाहेर असलेले टवाळखोर कॉपी पुरविण्यासाठी सुसाट दुचाकींनी कॉपी पुरवीत आहेत; तर काही चक्क दगडाला गुंडाळून कॉपी दुसऱ्या मजल्यावर भिरकावत आहेत; त्यामुळे परीक्षेला खिडकीजवळ बसलेल्या विद्यार्थ्यांचे डोके फुटल्याचे प्रकारही घडत आहेत. ज्या केंद्राच्या बाजूला मोठी इमारत आहे, अशा इमारतीच्या भिंतींवर चढून जिवाची पर्वा न करता काठी किंवा दगडाच्या साह्याने कॉपी परवणारे बहुतांश केंद्रावर दिसत आहेत. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा 1 मार्चपासून, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. त्यासाठी शिक्षण मंडळातर्फे यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती; मात्र याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. शहरापासून अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटरजवळ असलेल्या एका दहावीच्या केंद्रावर जवळपास 334 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. या केंद्रावर मंगळवारी (ता. पाच) इंग्रजीचा पेपर असल्याने केंद्राभोवती टवाळखोरांची गर्दी होती. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून केंद्रांवर "सुरळीत' परीक्षा सुरू होती. 

"अर्थ'पूर्ण तडजोड 
दहावी-बारावीच्या परीक्षेत शेकडो "ढ' विद्यार्थ्यांना चांगल्या मार्काने पास करण्यासाठी जिल्ह्यातील काही निवडक संस्थांमधून वर्षभरातील उपस्थिती व अभ्यासक्रमांच्या सोपस्काराला फाटा देऊन "अर्थ'पूर्ण तडजोडी करून कागदोपत्री घोडे नाचवत प्रवेश व परीक्षेला विद्यार्थी बसवले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक स्थानिक अभ्यासू विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT