corona
corona 
मराठवाडा

Corona Breaking ; हिंगोलीत रविवारी पंचवीस रूग्ण पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात रविवारी (ता.नऊ) नव्याने पंचवीस रुग्ण आढळून आले आहेत तर सोळा रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. 

जिल्ह्यात नव्याने पंचवीस रूग्ण आढळले आहेत. यापैकी तीन हे रॅपीड अँन्टीजन टेस्टद्वारे व २२ रूग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळुन आले. तर सोळा रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ८४० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६२२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण २०९ रुग्णांवर उपचार चालू आहेत आणि आतापर्यंत नऊ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

वसमतला आजपासून रॅपिड अँटीजेन टेस्ट 
वसमत ः जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वसमत येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याच्या मोहिमेस सुरवात होणार असून सोमवारी (ता.दहा) दूधडेअरी मालक-चालक, कामगारांची तर मंगळवार (ता.११) कृषी सेवा केंद्र, फर्टिलायझर्स मालक-चालक कामगारांची तपासणी होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे होणार टेस्ट
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात १४ दिवस संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत वसमत शहर व नजीकच्या सर्व दूधडेअरी मालक-चालक, कामगारांची सोमवारी तर मंगळवारी कृषी सेवा केंद्र, फर्टिलायझर्स कृषी सेवा केंद्र मालक-चालक कामगारांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याबाबत नियोजन केले आहे. ही टेस्ट करण्यासाठी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सनाउल्ला खानसह विविध विभाग यांना जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. टेस्ट करण्यासाठी सकाळी दहा वाजता नावनोंदणी केली जाणार आहे आणि अकरा वाजता उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे टेस्ट प्रकियेस सुरवात होणार आहे. जे व्यापारी व नमूद व्यावसायिक रॕपिड अँटीजेन टेस्ट करून घेणार नाहीत त्यांची आस्थापने, दुकाने उघडण्यास पुढे अडचणी येणार असून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.  

हिंगोली जिल्हा  
एकूण बाधित - ८४०
एकूण बरे - ६२२
उपचार सुरु असलेले - २०९
एकूण मृत्यु - ०९
आजचे बाधित - २५
आजचे मृत्यु - शुन्य

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT