file photo 
मराठवाडा

कोरोना : मराठवाडयातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ता. २१ व २२ मार्च रोजी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी  मराठवाडयातील आठही जिल्हयांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी आज व्हीसीव्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणुला रोखण्यासाठी जनतेने स्वयस्फुर्तीने बंद पाळणे आवश्यक आहे.  ता. २१ व २२ मार्च रोजी जनतेने घराबाहेर पडू नये, अशी  सूचना त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर  विभागीय आयुक्तांनी मराठवाडयातील आठही जिल्हयांतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश  दिले आहेत.

अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या आस्थापना सुरु

सदर दोन दिवसांच्या बंदमधून पुढील आस्थापनांना वगळण्यात आले आहे. यामध्ये शासकीय/निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने व औषधे दुकाने, विदयुत पुरवठा, ऑईल व पेट्रॉलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमं, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना यांना वगळून आठही जिल्हयांतील सर्व आस्थापना व दुकाने ता.२१ व ता. २२ मार्च रोजी बंद ठेवावेत, असे विभागीय आयुक्तांनी सूचित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

SCROLL FOR NEXT