File Photo 
मराठवाडा

कोरोना : पुण्याहून आलेले ते तीघे रुग्णालयात

शिवचरण वावळे

नांदेड : शिक्षण व कामानिमित्त पुणे शहरात स्थलांतरीत झालेले शेकडो नागरीक शहरात परत येत आहेत. शुक्रवारी (ता.२० मार्च २०२०) शहरात दाखल झालेल्या नागरीकां पैकी ‘त्या’ तीन व्यक्तींना कोरोनाचा संशयीत म्हणून नव्हे तर, केवळ त्यांच्या लाळेची तपासणी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

शेकडो नागरीक शहरात दाखल
यापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कोरोनाची पूर्व खबरदारीचे उपायोजना म्हणून पुणे किंवा मुंबई शहरातून नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार शेकडो नागरीक शहरात दाखल होत आहेत. त्यांना ताप, सर्दी, खोकला अशी काही लक्षणे अढळुन आल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

लक्षणानुसार उपचार केला जाणार

यापुढे देखील शहरात दाखल झालेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असून, त्यांच्यात कोरोना आजाराची काही लक्षणे आढळुन आल्यास त्यांच्यासाठी विशेष कक्षा तयार करण्यात आला आहे. त्या कक्षात ठेवून त्यांच्यावर लक्षणानुसार उपचार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. नांदेड शहर व जिल्ह्यात असोलेशन व क्वॉरंटाईन वार्डची स्थापना करण्यात आली असून, जिल्ह्यतील प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयात या विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

कोरोना सुट्टीचा गैरफायदा; कर्मचारी घरी बसेनात

नांदेड : दोन व्यक्तींमध्ये किमान दोन ते तीन फुटाचे समांतर अंतर राखण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालयातील पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना एका दिवस घरी आणि एक दिवस कामावर हजर राहण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

दरम्यान कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली असली तरी, ऐनवेळी एखाद्या कर्मचाऱ्यास कार्यालयात बोलावले तरी जावे लागणार आहे. विशेष म्हणजे सुट्टी देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी घरात आराम करणे अपेक्षित आहे. परंतु याची अनेक कर्मचाऱ्यांनी गंभीर दखल घेतलेली नाही. त्यामुळे शासनाचे कर्मचारी इतर नागरीकांप्रमाणेच बाजारात गर्दीच्या ठिकाणी आढळुन येत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या गंभीर इशाऱ्याची देखील कर्मचारी दखल घेत नसल्याचे स्पस्ट होते. शुक्रवारी (ता.२० मार्च २०२०) तारखेपासून शासकीय कार्यालयात पन्नास टक्के कर्मचारी हजर होते. यासाठी त्या-त्या कार्यालय प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना कधी सुट्टी द्यायची याबद्दल नियोजन तया केले आहे. त्यानुसार गुरुवारीच सर्व कर्मचाऱ्यांना नोटीसीद्वारे कळविण्यात आले आहे.

अर्ध्या कर्मचाऱ्यांना अंतर राहावे आणि कळत न कळत होणाऱ्या ‘कोरोना’आजाराचा फैलाव हो ऊनये म्हणून हा खबरदारीचा उपाय करण्यात आला आहे. परंतु अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचारी घरी न बसता गर्दीच्या ठिकाणी फिरताना आढळुन येत आहेत. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी शासकीय कार्यालयातील पन्नास टक्के कर्मचारी यांना एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

SCROLL FOR NEXT