Corruption in solar offgrid system work at Latur
Corruption in solar offgrid system work at Latur  
मराठवाडा

अजबच! मार्चमध्ये काम पूर्ण अन् जूनमध्ये साहित्य दाखल

सकाळ वृत्तसेवा

लातूर  : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर सौरऊर्जा प्रकल्पांचे (सोलार ऑफग्रीड सिस्टीम) काम पूर्ण न करताच मोजमाप पुस्तिका (एमबी) तयार केल्याच्या प्रकरणात आणखी एक किस्सा पुढे आला आहे. मार्चमध्ये पूर्ण दाखवलेल्या या कामांचे साहित्य मागील महिन्यात म्हणजे जूनमध्ये केंद्रात दाखल झाले आहे.

चौकशी सुरू होताच हे साहित्य आणून टाकल्याचा प्रकार घडला असून, लाखो रुपयांच्या कामांची निविदा, कार्यारंभ आदेश व मोजमाप पुस्तिका एकाच महिन्यात काही दिवसांच्या फरकाने तयार केल्याचेही समोर आले आहे. 
प्राथमिक आरोग्य केंद्रांत चोवीस तास वीज देण्यासोबत केंद्रावरील वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने ही योजना राबवली. हेर, देवर्जन (ता. उदगीर), लामजना, उजनी (ता. औसा), मदनसुरी (ता. निलंगा) व शिरूर अनंतपाळ या सहा केंद्रांवर प्रकल्पातील काहीच साहित्य आले नसताना काम पूर्ण झाल्याची मोजमाप पुस्तिका शाखा अभियंता (विद्युत)
एस. जी. कांबळे यांनी तयार केली. कामाचे बीलही दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव यांच्या तक्रारीनंतर चौकशीसाठी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. समितीने २२ व २३ जूनला आरोग्य केंद्रांना भेटी देऊन चौकशी केली. काम पाहून समितीला चांगलाच धक्का बसला. मार्चमध्ये पूर्ण दाखवलेल्या कामांचे साहित्य समिती चौकशीला येण्यापूर्वी काही दिवस आले होते. यात आलेले साहित्यही अपूर्ण होते.

अधिक चौकशीत सहापैकी चार कामांना तीन ऑक्टोबर २०१८ तर दोन कामांना सात मार्च २०१९ ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे न झालेले हे काम मार्चमध्ये अचानक मार्गी लागले. मार्चमध्ये एकाच महिन्यात कामांच्या निविदाही निघाल्या. त्या मंजूरही झाल्या आणि २४ ते २६ मार्चदरम्यान कार्यारंभ आदेशही (वर्कऑर्डर) काढण्यात आले. त्यानंतर चार दिवसांत हे काम पूर्ण झाल्याची मोजमाप पुस्तिका तयार करून बांधकाम विभागाकडून वित्त विभागाला देयकही सादर करण्यात आल्याचे उघड झाले. समितीने केलेल्या चौकशीत सहापैकी एकही काम पूर्ण झाल्याचे आढळून आले नाही. यामुळेच अभियंता कांबळे यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. 

                                                              (संपाादन : विकास देशमुख) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT