Accident In Badanapur 
मराठवाडा

लग्नसोहळा आटोपून घरी परताना अपघात, कारच्या धडकेत पती-पत्नी ठार

आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) : औरंगाबादहुन जालन्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले आहे. हा भीषण अपघात मंगळवारी (ता.आठ) दुपारी एक वाजता पाथ्रीकर  कॅम्पस समोर घडला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गारखेडा तांडा (ता. सिंदखेडराजा, जि.बुलडाणा) येथील रामेश्वर बाबुराव चव्हाण (वय ४५) व त्यांच्या पत्नी इंदूबाई (वय ४०) असे दोघे औरंगाबाद येथे एका लग्न सोहळ्यासाठी मंगळवारी आले होते.

लग्न सोहळा पार पडल्यानंतर दोघे दाम्पत्य आपल्या दुचाकीने (एमएच २८ एए ४०९५) गावाकडे परतत असताना भरधाव वेगाने जालन्याकडे जाणाऱ्या कारने (एमएच ०१ बीएफ ९३९१) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात रामेश्वर व इंदूबाई चव्हाण दाम्पत्य गंभीर जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू  झाला. अपघातात कारच्या दर्शनी भागाचे तर दुचाकीच्या पाठीमागील भागाचे मोठे नुकसान झाले.


अपघातानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून कार नागेवाडी टोलनाक्यावर अडवून कार चालकास पकडले. त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, माहिती मिळताच बदनापूर ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर, सहायक फौजदार श्री. खंडागळे, इब्राहिम शेख आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चव्हाण दांपत्याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी मृत रामेश्वर चव्हाण यांचे काका शेषराव रायसिंग चव्हाण यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्री. खंडागळे करीत आहेत.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : धुळे महानगरपालिकेच्या अजितदादा गटाच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT