ट्रकने दुचाकीला चिरडले.
ट्रकने दुचाकीला चिरडले. सकाळ
मराठवाडा

धार्मिक कार्यक्रमावरुन परताना पती-पत्नीवर काळाची झडप,दोघे ठार

जलील पठाण.

औसा (जि.लातूर) : औसा-लातूर मार्गावरील कारंजे खडी केंद्रासमोर एक दुचाकी ट्रकखाली येऊन दुचाकीवरील पती पत्नी जगीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की महिलेच्या शरीराचा पार चेंदामेंदा झाला. जखमी मुलीला लातूरला हलविण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी (ता.२३) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला. या बाबत मिळालेली माहिती अशी की, कर्नाटक (Karnataka) राज्यातील वांजरखेड तांडा (ता.भालकी, जि. बिदर) येथील रहिवासी राजाभाऊ राठोड, त्यांच्या पत्नी सखुबाई व मुलगी स्वाती राठोड हे तिघेही लातूरमध्ये (Latur) राहत असलेले त्यांचे जावई अमोल लक्ष्मण राठोड यांच्याकडे धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. तो कार्यक्रम आटोपून शुक्रवारी ते तिघेही दुचाकीवरुन (एमएच २४ एसी 8903) परत आपल्या गावी निघाले होते. त्यांची दुचाकी औसा-लातूर मार्गावरील कारंजे खडी केंद्राजवळ आली असता एका मोठ्या मालवाहू ट्रकला ओव्हरटेक करीत असताना रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे त्यांचा तोल गेला आणि तिघेही थेट मालवाहू ट्रकच्या (टीएन ३४ एझेड २००८) मागच्या चाकाखाली आले.(couple died In accident on ausa latur road glp 88)

सुरुवातीला सखुबाई पडल्याने चाकाखाली त्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यांचा एक पाय मांडीपासून तुटून घटनास्थळी पडला होता. त्या पाठोपाठ राजाभाऊ पण टायर खाली आले. त्यांच्याही अंगावरून टायर गेले. मात्र या अपघातात दोघेही जागीच ठार झाले, तर चालकाने वेळीच ब्रेक दाबल्याने मुलगी स्वाती थोडक्यात बचावली. तिला तातडीने लातूरच्या दवाखान्यात हलविण्यात आले आहे. सध्या या मार्गाने काम सुरू असल्याने एकाच लाईनवरून वाहनाची ये-जा आहे. पावसाने खड्डे पडलेले आहेत. अपघात घडताच औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठविले, तर वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT