तीन हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे  sakal
मराठवाडा

Crime news : जालन्यात तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तीन महिलांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

जालना : शहरात सुरू असलेल्या तीन हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (ता. २३) पहाटे छापा टाकून उद्ध्वस्त केल्या आहेत. शिवाय चार लाख आठ हजार ५०० रुपयांची गावठी दारू आणि रसायन नष्ट केले आहे. या प्रकरणी तीन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जालना शहर उद्योग आणि व्यापारी नागरी म्हणून सर्वत्र परिचित आहे. मात्र, याच शहर वर्षानुवर्ष गावठी दारू ही तयार करणाऱ्या हातभट्टीच्या चुली बारा महिने सुरू असतात. त्या पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि बीट अंमलदार या हातभट्ट्यांवर कारवाई करताना दिसत नाही. विशेष म्हणजे शहरातील विशिष्ट भागात गावठी दारू निर्मितीचे गुत्ते सुरू असतात. दरम्यान, कैकाडी मोहल्ला येथील तीन गुत्त्यावर रविवारी पहाटे पाच वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकले.

यावेळी तीन हातभट्ट्यांवर गावठी दारू तयार करताना तीन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. शिवाय त्यांचे ताब्यात चार लाख आठ हजार ५०० रुपयांची गावठी दारू व सडके रसायन ही मिळून आले. ही गावठी दारू आणि रसायन पंचासमक्ष जागेवर नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तीन महिलांविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, अंमलदार सॅम्युअल कांबळे, भाऊराव गायके, फुलचंद हजारे, संजय मगरे, विनोद गडधे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, देविदास भोजने, परमेश्वर धुमाळ, किशोर पुंगळे, भागवत खरात, कैलास चेके, सचिन राऊत, योगेश सहाने, धीरज भोसले, रमेश पैठणे, महिला अंमलदार रेणुका बांडे, अरुणा गायकवाड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT