crime sakal
मराठवाडा

Marathwada Crime News : नवजात अर्भकाला फेकून आई फरार, कर्तव्यदक्षतेमुळे वाचले प्राण

रस्त्याच्या कडेला अंधारात त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला.

सकाळ वृत्तसेवा

वाळूज महानगर - मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिलेल्या एका अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला. आणि मॉर्निंग वॉक करणारे तरुण व पोलीस मदतीसाठी धावले. तात्काळ दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे नवजात अर्भकाचे प्राण वाचले. हा प्रकार वाळूज परिसरातील तिसगाव चौफुली येथे बुधवारी (ता.18) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील तिसगाव चौफुली येथे कोणीतरी अज्ञात महिलेने स्त्री जातीच्या एका नवजात अर्बकाला मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिले. मात्र म्हणतात ना,'देव तारी, त्याला कोण मारी'. म्हणूनच तेजस घुगे समाधान घुगे, किरण नरवडे हे देवाच्या रूपात बुधवारी (ता.18) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत होते.

रस्त्याच्या कडेला अंधारात त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहीले असता नुकतेस जन्मलेले स्त्री जातीचे बाळ त्यांना दिसले. ही माहिती त्यांनी तात्काळ वाळुज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत सोनवणे यांनी घटनास्थळी धाऊन आले.

त्यांनी नवजात अर्भकाला कविता साळुंके व जयश्री अर्दड यांच्या मदतीने उपचारार्थ घाटी दवाखान्यात दाखल केले. सुदैवाने हे बाळ सुखरुप असून त्याच्या आईचा शोध सुरू आहे. अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मले, म्हणूनच त्याला मरण्यासाठी रस्त्यावर फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माळशेज घाटमार्गे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

मला सारखा सारखा फोन नका करू, मी आता देशाचा मुलगा; अभिजीत दीपके वडिलांना असं का सांगितलं?

Nashik Dam Water Level Latest Update : आबादानी! धरणसाठा पोहोचला 79 टक्क्यांवर, आठ दिवसांतील पावसाचा परिणाम; 24 पैकी 14 धरणांमधून विसर्ग सुरूच

Latest Marathi News Live Update : माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

मुलींना शिकवण्याआधी आजी-आजोबांना शिकवा... नीना गुप्तांनी सांगितला 'पंचायत' दरम्यानचा किस्सा; म्हणाल्या, 'ज्या गावात...'

SCROLL FOR NEXT