file photo
file photo 
मराठवाडा

'माफ करा नाना' म्हणत मुलगा झाला गायब, आणि... 

सकाळ वृत्तसेवा

बीड : वडील रागावल्यामुळे मुलाने फेसबुकवर "माफ करा नाना. पण, मी मोठा निर्णय घेतोय' अशी पोस्ट फेसबुकवर टाकली. घाबरलेल्या शेतकरी कुटुंबाने थेट पोलिस सायबर सेल गाठले. सगळी यंत्रणा तात्काळ हलली आणि मुलाचे प्राण वाचले.

तालुक्‍यातील भवानवाडी येथील एका शेतकऱ्याचा मुलगा दोन वर्षांपासून शहरातील शिवाजीनगर परिसरात किरायाच्या रूममध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याला वडिलांनी शनिवारी (ता. 28) फोन केला; परंतु त्याने उचलला नाही. यामुळे वडिलांनी शहरात येऊन "तू माझा फोन का उचलला नाही,' असे म्हणत त्याला दटावले. याचाच राग मनात धरून त्याने फेसबुकवर "माफ करा नाना. पण, मी मोठा निर्णय घेतोय' अशी पोस्ट केली होती. यामुळे शेतकरी कुटुंब पूर्णपणे घाबरले.

रागाच्या भरात मुलगा काही बरा वाईट निर्णय घेऊ नये, अशी त्यांच्या मनात भीती होती. यानंतर युवकाच्या वडिलांनी सायबर सेलमध्ये सर्व माहिती दिली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांनी सर्व यंत्रणा हलवित युवकांचा शोध घेऊन वडील व मुलाची भेट घडवून आणली.

ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे, सलीम शेख, असेफ शेख, संतोष म्हेत्रे, विकास मुंडे, विकी सुरवसे, अविनाश गवळी यांनी केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT