Daku Pimpri sand transportation revenue department seized 1 crore 30 lakh material
Daku Pimpri sand transportation revenue department seized 1 crore 30 lakh material sakal
मराठवाडा

परभणी : माफियांच्या पायाखालची ‘वाळू’ सरकली

सकाळ वृत्तसेवा

पाथरी : परभणी जिल्ह्यात वाळूचा नियमबाह्य उपसा सुरू आहे. पण, महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, पोलिस सक्रिय झाले असून, डाकूपिंप्री वाळू घाटावर परभणी पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी पहाटे दोन वाजता छापा टाकून पाच पोकलेन, दोन जेसीबी व वाळू वाहतूक करणारा हायवा असा एक कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आठवडाभरात गोदावरीच्या पात्रात पोलिसांनी केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. त्यामुळे वाळू माफियांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.

कंत्राटदाराने या घाटावर एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत वाहत्या पाण्यामध्ये दगड-गोटे व मुरूम तसेच वेड्या बाभळीचे लाकडाचे साह्याने पात्रात बंधारा बांधून नदीपात्राला विद्रूप केल्याचे पोलिसांनी तक्रारीत नमूद केले आहे, एक महिन्यापूर्वी आमदार बाबाजानी दुराणी यांनी या वाळू घाटावर नियमाने वाळू उपसा होत नसल्याची तक्रार केली होती.

पालम, गंगाखेड तालुक्यातील नियमबाह्य वाळू उत्खननावर कारवाईनंतर पोलिस प्रशासनाने आता पाथरी तालुक्यातील बहुचर्चित डाकूपिंप्री धक्यावर गुरुवारी पहाटे छापा टाकला. यावेळी नियमानुसार रात्री वाळू उपसा करता येत नसतानाही ठेकेदार जेसीबी, पोकलेन मशीनद्वारे वाळू उपसा करीत होते. पोलिसांच्या छाप्यात पाच पोकलेन मशीन, दोन जेसीबी व एक वाळू वाहतूक करणारा हायवा असे एक कोटी ३० लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिस नायक सुरेश वाघ यांच्या तक्रारीवरून कंत्राटदार मोहम्मद खान वहिद खान यांच्यासह मोहम्मद मुंतजीब खान, केशव वाल्मीक मुंढे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईनंतर गंगाखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रमिक लोढा, पाथरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

महसूल विभाग हतबल?

डाकूपिंप्री वाळू घाटावर नियमबाह्य वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत असताना महसूल विभाग शांत आहे. त्यामुळे याचे कारण काय, महसूल विभाग कशामुळे हतबल आहे, अशी चर्चा रंगली आहे.

उपशाचे असे आहेत नियम

  • वाळू उत्खननासाठी पर्यावरणविषयक परवानगी अत्यावश्यक

  • वाळू उपसा करण्यापूर्वी कंत्राटदाराने तेथे फलक लावणे गरजेचे

  • उत्खनन हे सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीतच करता येणार

  • नदीपात्रामध्ये मोठी वाहने नेण्यास बंदी

  • वाळूचे उत्खनन मनुष्यबळाद्वारे करावे लागेल. पोकलेन, जेसीबीचा वापर करता येणार नाही

  • वाळू वाहतुकीसाठी एकच रस्ता ठेवण्याची सक्ती

  • उपसा करणाऱ्या वाहनांना कंत्राटदाराने वाहतूक पास देणे अत्यावश्यक

  • पासेसची तपासणी करण्याचे अधिकार ग्रामसेवक, सरपंच यांनाही

  • वाळू उत्खनन ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ची सक्ती

इतर ठिकाणचे काय?

परभणी जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी वाळूचा नियमबाह्य उपसा सुरू आहे, त्या ठिकाणी पोलिस कारवाईची वाट पाहावी लागणार की, महसूल विभाग, ग्रामपंचायत कारवाईसाठी पुढाकार घेणार, हा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT