File photo 
मराठवाडा

दरेगाव शिवारात बिबट्याचा मुक्‍त वावर सुरुच

गंगाधर डांगे

मुदखेड :  तालुक्‍यातील माळकौठा शिवारातील आजारी बिबट्याला वन विभागाने ताब्‍यात घेवून त्‍याच्‍यावर वैद्यकीय उपचार केले. कालातरांने सदर बिबट्या कोणत्‍या जंगलात गेला याचा पत्ता लागला नसला तरी गेल्‍या कांही दिवसांपासून दरेगाव शिवारात बिबट्याचा पुन्‍हा मुक्‍त वावर सुरु आहे.

दरेगाव येथील केसापूर शेत शिवारात माधव बळी गाढे यांच्‍या आखाड्यावरील गायीवर  बुधवार, ता. 18 डिसेंबर 2019 रोजी रात्री बिबट्याने हल्‍ला करुन तीला ठार केले होते. या घटनेने दरेगाव शेत शिवारातील शेतकरी भयभीत झाले असून वन विभाग केवळ पंचनाम्‍याचे सोपस्यकार पुर्ण करीत आहेत.  शुक्रवार, ता. 20 डिसेंबर रोजी पुन्हा रात्री याच शिवारात माधव गाढे यांच्‍या आखाड्यावरील वगारीवर बिबट्याने हल्‍ला करुन ठार केले. बिबट्याने श्री. गाढे यांच्यावरही झेप घेतली होती. परंतु, ते एका झाडावर चढून आपला जीव वाचवला. ग्रामस्थांना बिबट्याच्‍या हल्‍याची माहिती कळताच रात्री ग्रामस्‍थांंनी घटनास्‍थळ गाठले. जमावाला पाहून बिबट्या उसाच्या फडात फरार झाला. 

बिबट्याचा बंदोबस्‍त करा
दरेगाव शिवारात बिबट्याचा मुक्‍त वावर सुरु आसल्‍यामुळे शेतकरी व त्‍यांचे कुटूंब भयभीत झाले आहेत. एखादी गंभीर घटना घडण्यापुर्वी वन विभागाने मुक्‍त बिबट्याचा वेळीच प्रभावीपणे बंदोबस्‍त करुन दरेगाव भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महात्गांमा गांधी तंटामुक्‍त गाव समितीचे अध्यक्ष गोविंदराव पाटील गाढे व सरपंच प्रतिनिधी नारायण राहेरे यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT