file photo 
मराठवाडा

अत्यावश्यक सेवांना दोन वाजेपर्यंत मुदत; मद्यविक्रीस बंदी : वाचा कुठे?

गणेश पांडे

परभणी : टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते ११ ऐवजी आता दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना सुट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (ता.९) दिले आहेत.
परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर काढलेल्या आदेशाद्वारे लॉकडाउनच्या कालावधीस ता. १७ मेपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी काढलेल्या आदेशाद्वारे ता. १० मेपर्यंत वाढ बहाल करण्यात आली होती. तो त्यास आता ता. १७ मे पर्यंत वाढविण्यात येत आहे. विशेषतः या कालावधीत अत्यावश्यक सेवांना आतापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ११ पर्यंत सुट देण्यात आली, परंतू आता ती सुट २ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरू राहिल, असे स्पष्ट केले असून या आधी काढलेल्या आदेशाप्रमाणे ज्या अस्थापना व दुकाने यांना सुट दिलेली नाही, ती पूर्णतः बंद राहतील, असे स्पष्ट केले आहे.

मद्यविक्रीस बंदी कायम
परभणी शहरासह जिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने बंदच राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. मद्यविक्रीस सद्यस्थितीत परवानगी दिल्यास मद्य खरेदीस मोठ्या प्रमामावर गर्दी उसळेल. त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्री ता. १७ मे पर्यंत बंद ठेवण्याबाबत आपण सुधारी आदेश काढला आहे.

 ग्राम सुरक्षा दलाची स्थापना 
 कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद स्वतंत्र विहित नोंदवहीमध्ये वेळोवेळी करणे आणि प्रत्येक व्यक्ती अधिकृतपणे आणि सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीसह गावात प्रवेश करत आहे, याची खात्री करण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे. याबाबत शुक्रवारी (ता.आठ) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश जारी केले आहेत. प्रत्येक गावात संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, संबधीत तालुक्याचे तहसिलदार व संबधित तालुक्याच्या पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांचा सदस्य म्हणून समावेश असलेली ग्रामसुरक्षा दल निवड समिती स्थापन करण्यात येईल. या समितीमार्फत एकमेकांच्या समन्वयाने ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांची निवड करून १० किंवा जास्त व्यक्तींचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात येईल.

ग्रामसुरक्षा दलाची रचना
 ग्रामसुरक्षा दल निवड समितीकडून ग्रामसुरक्षा दलातील सभासदांची निवड करतांना ते स्वेच्छेने काम करणारे स्वयंसेवक असतील व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसेल आणि  ते कोणत्याही समाज विघातक संघटनेशी संबधित नसतील आणि समाजात त्यांना मान आणि प्रतिष्ठा असेल याची सुनिश्चिती करण्यात येईल.  ग्रामसुरक्षा दलात गावातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, हिंदू , मुस्लिम अशा विविध जाती - जमाती आणि धर्माच्या व्यक्तींचा समावेश असेल.  ग्रामसुरक्षा दलातील सभासदांची वयोमर्यादा २५ वर्ष ते ४५ वर्ष यापेक्षा जास्त नसेल.  ग्रामसुरक्षा दलातील ज्येष्ठ व्यक्ती दलाचा अध्यक्ष म्हणून काम करतील. ग्रामसुरक्षा दलातील एकूण व्यक्तीपैंकी जरूर तितक्या व्यक्तींचे समूह तयार करण्यात येतील आणि हे समूह आळीपाळीने २४ तास कार्यरत राहतील. ग्रामसुरक्षा दलातील व्यक्तींना विहीत नमुन्यात संबंधित पोलिस ठाण्याच्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत ओळखपत्र देण्यात येईल. यानुसार ग्रामसुरक्षा दलाची रचना असणार आहे. असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी कळविले आहे.
               

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''..तर अजितदादांनी आम्हांला तसं सांगितलं असतं'', दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Solapur News: रखडलेल्या बसवेश्वर पुतळ्यासाठी २४ संघटना एकवटल्या; भरघोस निधी असतानाही प्रत्यक्ष काम न झाल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

MSME Budget 2026: निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पातून ट्रम्प यांना खणखणीत उत्तर; एमएसएमईच्या बळकटीकरणामुळे युरोपीय बाजारपेठेत भारताचा दबदबा!

Pune Dirty City Controversy : पुणे घाणेरडे शहर, बिल गेट्सच्या माजी सल्लागाराने व्यक्त केलेला तिरस्कार, एपस्टीन फाइल्समध्ये धक्कादायक खुलासा

लग्नानंतर 14 वर्षांनी सुपरस्टार अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म

SCROLL FOR NEXT