Santosh Deshmukh Murder Sakal
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder : सरपंचांना 353 कलमांतर्गत संरक्षण द्या..! ग्राम संवाद सरपंच असोसिएशनची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी आरोपींना अटक करून फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, अशी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनची मागणी आहे.

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुन हत्या करण्यात आल्याने यातील आरोपीला तात्काळ अटक करून हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवा. आणि राज्यातील सरपंचांना कमल 353 अंतर्गत संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सदरील निवेदनात म्हटले आहे की, केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास निघृण हत्या करण्यात आली. ही घटना केवळ निंदनीयच नाही, तर लोकशाही व्यवस्थेचा घात करणारी आहे. या घटनेने राज्यातील सर्व सरपंच आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण केले आहे.

ग्रामविकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जर अशा पद्धतीने ठार मारले जाणार असेल, तर राज्य शासनाने त्यांच्या सुरक्षिततेबाबतची जबाबदारी घेतली आहे का.?, असा सवाल निर्माण होतो. अशा हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी केवळ शब्दांचे आश्वासन नाही, तर ठोस व कठोर कृती अपेक्षित आहे.

त्यामुळे तात्काळ सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोषींना तातडीने अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, राज्यातील सर्व सरपंचांना भारतीय दंड संहिता कलम ३५३ अंतर्गत संरक्षण त्वरित लागू करावे, सरपंच व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या सुरक्षिततेसाठी विशेष योजना तयार करावी अन्यथा ग्रामसंवत सरपंच असोसिएशनच्या वतीने ग्रामविकास क्षेत्रातील सर्व प्रतिनिधींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी या निवेदनाद्वारे दिला आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Block: नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द; मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक

IPL 2026 : “वैभव सूर्यवंशीची नेमकी कमजोरी शोधणे कठीण”; इयान बिशप यांनी RR च्या युवा फलंदाजाचे केले कौतुक

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

Mumbai Sea Transport: आखाती तणावाचा मुंबई सागरी वाहतुकीवर फटका; इंधनदरवाढीमुळे रो-रो व फेरी बोटींच्या भाडेवाढीची शक्यता

Indian Culture Board Game: दादरच्या साहिलराजे शिर्केचा ‘मुमुक्षू’ देशभर गाजतोय; भारतीय जीवनमूल्यांवर आधारित बोर्ड गेम मोबाईलला टक्कर

SCROLL FOR NEXT