मराठवाडा

आरक्षण मागणीसाठी परळीत पुन्हा ठिय्या आंदोलन

प्रविण फुटके

परळी वैजनाथ : राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांनंतर मराठा आरक्षण मागणीचा हुंकार राज्यभर पेटविणाऱ्या परळीत जुलै-ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवस ठिय्या आंदोलन झाल्यानंतर आता पुन्हा आणखी या मागणीसाठी रविवार (ता. 25) पासून येथील तहसिल कार्यालयासमोर आंदोलन सुरु झाले आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने यापूर्वी मराठा आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी परळीत यापूर्वी ता. 18 जुलै ते सात ऑगस्ट 21 दिवस ठिय्या आंदोलन झाले. आंदोलनामुळे पुन्हा एकदा राज्यभर या मागणीच्या आंदोलनाचा वनवा पेटला होता. दरम्यान, या आंदोलनात समाजाला शासनाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत असा आरोप करत रविवार पासून पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना पुर्वीप्रमाणे दिशाभूल न करता ठोस आणि कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींला फाशीची शिक्षा द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नावांमध्ये मराठा नावाचा उल्लेख करावा, कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत करून बँकांना कर्जवितरण सक्तीचे करावे, मागील आंदोलनात आरक्षण मागणीसाठी शहीद झालेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत करावी, आरक्षण मागणी आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

दरम्यान, आंदोलकांना मंडप टाकण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. आंदोलनाचे निवेदन देणाऱ्यांना प्रशासनाने नोटीसा बजावून आंदोनापासून परावृत्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT