mukrmabad.jpg 
मराठवाडा

लॉकडाउन असतानाही परतले गावात

विनोद आपटे


मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः ‘कोरोना’चा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने सुरक्षेच्या कारणावरून महिन्यापूर्वीच देशात सर्वत्र लॉकडाउन केले आहे. हा लॉकडाउन तीव्र असातानाही मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथील आठरा मजूर हे सांगली, हैदराबाद येथून दुचाकींवर गावात आल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून मंडळ अधिकारी एस. बी. मुंढे यांनी त्यांना गावातीलच शाळेत तात्पुरते विलगीकरण करून ठेवले आहे.

मुक्रमाबादपासून जवळच असलेल्या सावरमाळ येथील अठरा मजूर हे सांगली व हैदराबाद येथे कामाला आहेत. देशात सर्वत्र लॉकडाउन झाल्यानंतर हे मजूर त्या ठिकाणीच अडकून पडले होते. एकीकडे दिवसागणिक कोरोना रुग्णांचा वाढत असलेला मृत्यूचा व वाढत्या रुग्णांचा आकडा हा भयभीत करणारा असून शासन यावर आळा घालण्यासाठी रात्रंदिवस एक करत असून ज्या ठिकाणी मजूर व इतर नागरिक आडकले आहेत त्यांनी त्याच ठिकाणी राहावे.


खाण्याची व राहण्याची व्यवस्था
त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय करण्यात राज्य सरकारकडून करण्यात आलेली असतानाही सावरमाळ (ता. मुखेड) येथील हे मजूर आपला व आपल्याला लेकरांचा जीव धोक्यात घालून आडमार्गाने रात्रीचा दुचाकींवरून प्रवास करत गावात परतले आहेत. तर यापैकी हैदराबाद येथून चार जण हे मिळेल त्या वाहनाने व पायी आले. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून त्यांना गावापासून दूर ठेवून त्याची तपासणी तत्काळ करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी शासनाकडे केली असून त्या ठिकाणी मंडळ अधिकारी एस. बी. मुंढे यांनी तत्काळ भेट देऊन त्यांना गावातीलच एका शाळेतील सर्व वर्गखोल्यांत विलगीकरण करून त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था केली आहे.


वैद्यकीय तपासणी लवकरच
सर्वत्र लॉकडाउन असून ज्या ठिकाणी मजूर आहेत त्याच ठिकाणी राहण्याचे शासनाचे आदेश असातानाही सावरमाळ येथील आठरा मजूर हे, दुचाकी वरून गावात आले असून याची माहिती जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना कळविली आहे. त्यांचे विलगीकरण करून राहण्याची व खाण्याची सोय केली असून त्यांची वैद्यकीय तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. असे एस. बी. मुंढे, मंडळ अधिकारी, मुक्रमाबाद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शस्त्रसंधीसाठी अटी! होर्मुझवर इराणसह ओमानही आकारणार टोल; भारताकडूनही वसुली?

Chhatrapati Sambhajinagar: डिजिटल रुपया काळाची गरज; रोख व्यवहारांना पर्याय; सुरक्षित, जलद, पारदर्शक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

Latest Marathi News Live Update: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदार मोहसिना किडवई यांचे निधन

Beed News: बीडकरांची तहान भागणार कशी?; ३४ कोटींच्या थकीत बिलामुळे नागरिकांचा घसा कोरडाच; अमृत योजनेला ३४ कोटींचा शॉक

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

SCROLL FOR NEXT