कसबा तारळे : गोकुळ दूध संघ ज्या मातीचा आहे, त्या कोल्हापुरात आमचे उमेदवार ठरतात; महायुतीला मात्र त्यासाठी दिल्ली, मुंबईत खलबते करत निर्णय होतात, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. त्यांच्या उमेदवारांची तेथे ठरणारी निश्चिती ही कोल्हापूरच्या स्वाभिमानासाठी काळा दिवस असल्याचेही त्यांनी सांगितले.