Ajit Pawar  esakal
मराठवाडा

महाराष्ट्राचा विकास सहकारामुळेच झाला; अजित पवार

अजित पवार; केंद्राच्या नवीन धोरणांमुळे सहकारी संस्था अडचणीत

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : केंद्र शासनाच्या बॅंके संदर्भातील नवीन धोरणांमुळे सहकारी संस्था अडचणीत येत आहेत. महाराष्ट्राचा विकास सहकारामुळेच झाला असल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले. लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी पतसंस्था व सिद्धेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १७) झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे, सुरेश वाबळे, मुकुंदकुमार सावजी, मिलींद आवाड, धैर्यशील सोळंके, आमदार संदीप क्षिरसागर, सोळंके पतसंस्थेचे अध्यक्ष विरेंद्र सोळंके, सिद्धेश्वर अर्बनचे अध्यक्ष सुनील रूद्रवार यांची उपस्थिती होती. श्री. पवार म्हणाले, आर्थिक संस्थेने समाजाच्या विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये. ठेवीचा पैसा चांगल्या पतसंस्थेत ठेवा.

लाभांश न देता, संस्था टिकवा. संस्थेला अडचणीत आणू नका असे नियम सहकार क्षेत्रात असताना केले. संकटाच्या काळात सहकारी संस्थांनी नेहमीच भरभरून मदत केली आणि नेहमीच करते. केंद्र शासनाच्या बॅंक विरोधी धोरणांचा राज्यातील अनेक बॅंकांना फटका बसलेला आहे. आर्थिक शिस्त महत्त्वाची असून दोन्ही संस्था व्यवस्थित चालवा. कोणाचीही दृष्ट लागू नये यासाठी काळजी घ्यावी. त्याचबरोबर दोन्ही संस्थेतून लोकाभिमुख काम झाले पाहिजे. हेलपाटे होता कामा नये. संचालक बोर्डाचे काम चांगले असावे असेही ते म्हणाले.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके आणि विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या दोघांच्या नावाला साजेस काम सोळंके सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून विरेंद्र सोळंके यांनी करावे असेही श्री. पवार म्हणाले. या उद्‍घाटन कार्यक्रमात माजलगाव विकास प्रतिष्ठानचा विशेष उल्लेख करत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलींना शिष्यवृत्ती देण्याचे काम व साडेतीनशे अनाथ मुली - मुलींच्या शैक्षणिक दायित्वाचे श्री. पवार यांनी कौतुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: गुन्ह्यांचं शतक करायचं होतं, पण ५०० रुपयांच्या नोटेनं खेळ बिघडवला, तरुणाला तुरुंगवास घडवला, काय घडलं?

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT