मराठवाडा

भक्तीसोबतच वाचन कट्टाही

प्रमोद चौधरी

नांदेड : ''अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची...,देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दिनाचा...'' या जगद्‍गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला अनुसरून जाती-पातीच्या भिंती ओलंडून पंचवीस वर्षांपूर्वी नांदेडच्या एमजीएम समोरील बजरंग कॉलनीत नागरिकांनी हनुमान मंदिराची उभारणी केली. त्याठिकाणी अखंडित भजन-गायनासोबतच युवकांसाठी वाचनकट्टा तसेच लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून प्रत्येक बुधवारी स्वाध्यायवर्गही घेतले जात आहे.

 
नांदेड शहरातील नमस्कार चौकाच्या वरील बाजूला बजरंग कॉलनी ही सर्वसामान्य, मोल-मजुरी करणाऱ्यांची वसाहत. या वसाहतीला लागूनच स्मशानभूमीसाठी नियोजित जागा होती. या जागेवर मंदिर व्हावे, अशी येथील नागरिकांची इच्छा असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन लढा उभा केला. त्याला यश येऊन मंदिरासाठी जागा मिळाली. लोकवर्गणी करून १९९२मध्ये गुण्या मारूती मंदिराची उभारणी केली. सूर्यकांत शंकरराव मुंगडेअप्पा आणि के. बी. अनरवाड यांनी यासाठी पुढाकार घेतला. सुरवातीला छोटी मूर्ती बसविण्यात आली होती. एप्रिल २०१७ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार लोकवर्गणीतून करण्यात आला. मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवस सप्ताहाचे आयोजन करून हरिकिर्तनासोबतच महाप्रसादाचे आयोजन मंदिर समितीच्या वतीने होते. 


सदस्यांचा कौतुकास्पद प्रयत्न
 

या वसाहतीमध्ये बहुतांश नागरिके हे मोल-मजुरी करणारी आहेत. दिवसभरातील ताण-तणाव घालविण्यासाठी काही नागरिक दर शनिवारी, पंधरवाडी एकादशीला हरीच्या नामामध्ये तल्लीन होऊन जातात.  सोबतच युवकांमध्ये वाचनसंस्कृती रूजविण्यासाठी वाचनकट्टाही चालविला जातो आहे. स्थानिक आठ दैनिकांसह विविध विषयांवरील २५० पुस्तकेही मंदिरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. युवकांना वाचनाची गोडी लागावी, त्यांच्यामध्ये हरीभक्तीची जाणीव निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश असल्याचे मंडळातील सदस्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. धार्मिक एकोपासाठीही मंडळातील सदस्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे.
 

सण-उत्सवांतही एकोपा
 

नियमित भजन-गायनातून एकतेची भावना निर्माण होतेच; पण रामजन्मोत्सव, कृष्णाष्टमी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दुर्गोत्सव आदी उत्सवांसोबतच सण देखील सर्व धर्मांतील नागरिकांना सोबत घेऊन साजरे करण्याची परंपरा गुण्या मारुती भजनी मंडळाने सुरु केलेली आहे. त्याला बजरंग कॉलनीतील सर्वच नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे. याशिवाय प्रत्येक बुधवारी श्री. शर्मा हे लहान मुलांसाठी स्वाध्यावर्गही चालवितात.
 

यांचा आहे पुढाकार
 

भजन-गायन तसेच एकत्रित सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गुण्या मारोती भजनी मंडळातील सूर्यकांत शंकरराव मुंगडेअप्पा, एन. के. महाजन, के. पी. वाघ, बी. जे. देवडे, विजय देशमुख, एम. एस. कोटपेलवार, साईनाथ पडूळ, बी. आर. कुलकर्णी, के. बी. अनरवाड, बाबूराव लांडगे, दिगंबर पवार, रामकिसन सोळंके, दुर्गेश सोळंके, रामराव कदम, विजय स्वामी, उंदुअप्पा देवणे, गंगाधर शेटकार, गुलाबराव सोळंके हे सदस्य सत्त कार्यान्वीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT