PM Crop Insurance Yojana esakal
मराठवाडा

PM Crop Insurance Yojana : 'शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा काढा'; कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं आवाहन

शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

विमा काढण्यासाठी काही अडचण असल्यास तालुकास्तरावर पीक विमा प्रतिनिधी यांची नियुक्ती केलेली आहे.

खामगाव : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Crop Insurance Yojana) शेतकऱ्यांनी (Farmers) 1 रुपयात विमा हप्ता भरून सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अतिवृष्टी, वादळ, पूर या नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamities) पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे चालू वर्षात या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे.

योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत १५ जुलै ही आहे. खरीप २०२४ हंगामात पेरण्या सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाने पीकविमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच विमा काढण्यासाठी काही अडचण असल्यास तालुकास्तरावर पीक विमा प्रतिनिधी यांची नियुक्ती केलेली आहे, आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता, असेही नमूद केले आहे.

कसा लाभ घेता येईल योजनेचा?

योजनेमध्ये खामगाव तालुक्यात खरीप कापूस, सोयाबीन, तूर, मूग, मक्का, ज्वारी ही पिके समाविष्ट आहेत. या सर्व पिकांचा विमा आपण प्रती अर्ज 1 रुपयात काढू शकता. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, पिक पेरा स्वयंघोषणापत्र ही कागदपत्रे देऊन आपण आपला विमा स्वतः पोर्टल वरून किंवा सीएससी सेंटर व बँकमधून काढू शकता, असे तालुका कृषी अधिकारी निमकर्डे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahada Bribery Case: वनपाल संजय पवार यांना न्यायालयीन कोठडी; सव्वादोन महिन्यांनंतर ‘एसीबी’ची दुसरी कारवाई

प्रभासला नेमकं झालंय तरी काय? ऑर्थोपेडिक सर्जनच्या पोस्टने वेधलं फॅन्सचं लक्ष, फॅन्स म्हणाले- ‘अन्ना, तुम्ही ठीक आहात ना?’ POST VIRAL

Lanja Flyover Traffic Update : गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा! लांजा उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू; पाहा पूर्ण पूल कधी होणार खुला?

Marathi News Live Updates : JSSC CGL आणि CDPO परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयाची स्थगिती

Rahul Gandhi : राहुल गांधी 'पॅलेट गन' पीडित साहिलला सोबत घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचले; एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT