Minister Dhananjay Munde Minister Dhananjay Munde
मराठवाडा

माझे नाव एवढे घेतले जाते की २४ तासांपैकी २ तास उचक्या लागतात

सकाळ डिजिटल टीम

बीड : आज भाऊबीज आहे. हा दिवस म्हणजे भाऊ आणि बहिणींच्या पवित्र नात्याचे प्रतीक. मात्र, आजही मुंडे भाऊ-बहिणीमध्ये बाद पाहायला मिळाला. दिवसातील चोवीस तासांपैकी दोन तास मला नुसत्या उचक्या येतात. मात्र, एवढ्या मोठ्या टीकेचा मी धनी झाला आहे, असे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचे नाव न घेता म्हणाले.

शनिवारी भाऊ बिजेच्या दिवशी परळी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपसहित पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. भाजपने पाच वर्ष सत्ता उपभोगली. मात्र, या पाच वर्षांच्या काळात त्यांना पाहिजे तशी कामे करता आली नाही.

भाजपने पाच वर्ष सत्ता उपभोगली तरीही परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम केले नाही. तो रस्ता आम्ही अवघ्या दीड वर्षात पूर्ण केला. यामुळे विरोधकांच्या ते पचनी पळत नाही आहे. यामुळेच ते उलट सुलट आरोप करीत फिरत आहे, असे धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

आपल्या मातीतल्या माणसाची काळजी लागते. मागच्या पाच वर्षांच्या काळात जो परळी-अंबाजोगाई रस्ता करता आला नाही, तो रस्ता आम्ही अवघ्या दीड वर्षात पूर्ण केला. यामुळेच दिवसाच्या चोवीस तासांपैकी दोन तास मला उचक्या लागतात. सध्या मी एवढ्या मोठ्या टीकेचा धनी झालो आहे, असेही ते म्हणाले.

माझे नावच घेतले जाते

मी ध्येय वेडा माणूस आहे. परळीमध्ये मोठ-मोठे उद्योग आले पाहिजेत, याचे मी स्वप्न पाहिले आहे. परळीकडे असंख्य लोकांनी वाटा वळवल्या पाहिजेत. अशी परळी मला निर्माण करायची आहे. भुयारी गटाराचे एवढे मोठे काम चालू आहे. विकास कामांमुळे दिवसातल्या २४ तासांपैकी दोन तास उचक्या लागत असतात. एवढे माझे नाव घेतले जाते, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

परळीचा चेहरा पूर्ण बदलणार

दिवसातून चार तास जरी उचक्या लागल्या तरी मी घाबरणार नाही. कारण, विकासकामे करताना थोडा वेळ तर लागणारच आहे. मी परळीचा चेहरा पूर्ण बदलणार आहे. तुम्ही जनतेने माझ्यावर प्रेम व विश्वास ठेवला, तसाच पुढे ठेवाल अशी अपेक्षा आहे. काही जण मला दोन वर्षांच्या कामाचा हिशोब मागत आहेत. त्यांना पण मी हिशेब देणारच आहे, अस म्हणत त्यांनी मुंडे भगिनींवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT