Cracker-Sound sakal
मराठवाडा

Dharashiv News : वायू , ध्वनी प्रदूषणाचा धाराशिवला विळखा

दिवाळीतील आनंदाच्या जल्लोशात फटाक्यातून ध्वनी तसेच वायू प्रदुषणाचा टक्का वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव - दिवाळीतील आनंदाच्या जल्लोशात फटाक्यातून ध्वनी तसेच वायू प्रदुषणाचा टक्का वाढत आहे. सायंकाळी सातच्या सुमारास रस्त्यावरून जातानाही वायू प्रदुषणाचा त्रास होत असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत. महानगराप्रमाणे फटाक्यांच्या उत्पादनावरच निर्बंध घालावेत, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून येत आहे.

दिवाळी हा एक आनंदाचा, उत्साहाचा सण असतो. यातून कौटुंबिक स्नेह वाढतो. सत्याने असत्यावर मिळवलेला विजय म्हणून दिवाळीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मात्र कोणत्याही बाबींना मर्यादा असतात. एखादी बाब मर्यादेच्या पलिकडे जाताच, त्याचे विपरित परिणाम होण्यास सुरूवात होते. गेल्या पाच- सहा वर्षात वायू तसेच ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

उत्पादनावरच निर्बंधाची गरज

प्रदुषणाचा टक्का वाढल्याने मुंबई, पुणे, दिल्लीसह अन्य शहरात निर्बंध घालण्याचे काम सुरू आहे. शिवाय न्यायालयानेही शासनाला चांगलेच फटकारले आहे. जेव्हा प्रदुषणाची पातळी वाढली.

तेव्हा त्यावर उपायोजना सुरू झाली आहे. मात्र अन्य ठिकाणी प्रदुषणाची पातळी वाढलेली नाही, म्हणून प्रतिबंध घातले जात नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. पातळी ढासळण्याची वाट पाहत आहेत का ? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

फटाक्यांच्या उत्पादनावरच निर्बंध घालावेत. जास्त प्रदुषण होणार नाही, असे फटाके बनवले पाहिजेत. मात्र उत्पादन होताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेत प्रदुषण जाणवत आहे. शिवाय आवाजावरही निर्बंध घातले पाहिजेत. अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

फटाक्यांचे फॅड वाढत आहे. आपण तहान लागल्यावर आड (विहिर) खोदतोत. प्रदुषण झाल्यावर पुन्हा उपायोजना करणार आहोत का? पुणे, मुंबईत प्रदुषण वाढल्याने उपायोजना करावी लागते. मग आपल्याकडे प्रदुषण वाढण्याची वाट बघत आहोत का? प्रदुषण मुक्तीसाठी तात्काळ निर्बंध घातलेच पाहिजे.

- प्रा. सुकेशनी मातने, पर्यावरण तज्ज्ञ.

फटाक्यांचे उत्पादन नियंत्रित झाले पाहिजे. सध्या गुटखा बंदी आहे. पण, विक्री सुरूच आहे. प्लॅस्टीकबंदी म्हणतात, अन उत्पादन सुरूच असते. प्रदुषण करणाऱ्या फटाका उत्पादनावर निर्बंध पाहिजेत. फटाके फोडण्यावर आपोआप निर्बंध येतील.

- नाना घाटगे, पर्यावरणप्रेमी, धाराशिव.

आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडावेच असे नाही. फटाक्याच्याऐवजी आकाशी दिवे लावणे, किल्ले स्पर्धा घेणे. अशा बाबी दिवाळीत व्हाव्यात.

- आनंद वीर, पर्यावरण प्रेमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT