शेतातल्या रस्त्याच्या वादातून चुलतीला ट्रॅक्टरखाली चिरडून मारून पुतण्या फरार
शेतातल्या रस्त्याच्या वादातून चुलतीला ट्रॅक्टरखाली चिरडून मारून पुतण्या फरार Sakal
मराठवाडा

Kalamb Crime News : शेतातल्या रस्त्याच्या वादातून चुलतीला ट्रॅक्टरखाली चिरडून मारून पुतण्या फरार

दिलीप गंभिरे

कळंब : शेतातल्या रस्त्याच्या वादातून चुलतीला ट्रॅक्टरखाली चिरडून मारून पुतण्या फरार झाल्याची काळीज धडधड उडवणारी घटना कळंब तालुक्यातील शिराढोण येथे घडली असून, पोलिसांनी पुतण्याला तातडीने अटक केली आहे.

हा प्रकार गुरुवार (ता.८) सकाळी ११ वाजता घडला, शुक्रवार (ता.९) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तालुक्यातील शिराढोंन येथील दोन चुलत भावात गेल्या महिन्यापूर्वी शेत रस्त्यावरून वाद सुरू होता.

या वादावरून गुरुवारी सकाळी शिलाबाई परमेश्वर यादव (वय - ४०) या महिलेस तिच्या पुतण्याने घराकडे जात असताना ट्रॅक्टर अंगावर घातले.यात जीव जाईना म्हणून त्याने चार पाच वेळेस या महिलेच्या अंगावरून ट्रॅक्टर घालून चिरडले.

काळीज पिळवून टाकणारी घटना सकाळी ११ च्या सुमारास येथील पेट्रोल पंपासमोरील पडीक असलेल्या शेतात घडली.परमेश्वर गोविंद यादव व बालाजी विठ्ठल यादव या दोन चुलत भावात शेतात जाण्याच्या रस्त्यावरून ब-याच दिवसांपासून वाद सुरू होता. या रस्त्याच्या वादात दोन कुटुंबांमध्ये कांही महिन्यांपूर्वी हाणामारी झाली होती. या हाणामारीत तीक्ष्ण हत्याराचा वापर झाला होता. त्यावेळी

दोन्हींकडील काही लोक गंभीर जखमी झाले होते. त्याच घटनेचा राग मनात धरून गुरुवारी सकाळी ११ वाजता घराकडे जाताना शिलाबाई परमेश्वर यादव या महिलेस चुलत पुतण्या समाधान बाळासाहेब यादव याने ट्रॅक्टरखाली घेवून चिरडले. दोन ते तीन वेळा ट्रॅक्टरखाली घेतल्यामुळे ती गंभीर जखमी झाली.

त्यानंतर आरोपी समाधान याने घटनास्थळापासून फरार झाला होता. महिलेस अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतू उपचारापूर्वी वाटेतच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, शिराढोणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर,

उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील, परमेश्वर पवार, इतर पोलीस कर्मचारी तसेच धाराशिव येथील फॉरेन्सीक टीम यांनी तपास कार्य सुरु केले. रात्री उशीरा सहायक पोलिस निरीक्षक नेहरकर यांनी व त्यांच्या टिमने फरार आरोपी समाधान यास अटक केली.

महिलेचे पती परमेश्वर गोविंद यादव यांनी रात्री उशीरा दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी समाधान बालाजी यादव याच्याविरुध्द पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. शुक्रवारी आरोपीला कळंब च्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्याण नेहरकर करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT