dharashiv  sakal
मराठवाडा

Dharashiv News : तुरोरी जोड कालवा बुजण्याच्या मार्गावर

तुरोरी मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने धरणातून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

तुरोरी - करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला तुरोरी मध्यम प्रकल्प कोळसुर लघु प्रकल्प जोड कालवा (लिंक कॅनोला)‌ झाडे झुडपे व गाळ पडल्यामुळे बुजण्याच्या मार्गावर असून पाटबंधारे विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

तुरोरी मध्यम प्रकल्पाला पाण्याचा ओघ कमी असल्याने व कोळसूर लघु प्रकल्पाला कर्नाटकातील पाण्याचा ओघ खूप असल्याने ते धरण लवकर भरते आणि अतिरिक्त पाणी दगडधानोरा साठवण तलावात पडते या साठवण तलावास पाण्याचा ओघ खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दगड धानोरा साठवण तलावही खूप लवकर फूल होते. साठवण तलाव ओव्हरफ्लाो झाले की अतिरिक्त पाणी पुन्हा कर्नाटकात जाते त्यामुळे १९९५ ला युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उमरगा चे तत्कालीन आमदार प्रा रवींद्र गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे जवळपास दहा कोटी रुपये खर्चाच्या जोड कालव्यास मंजुरी दिली.

त्यानंतर २००२ ला सदरील काम पूर्ण झाले व कोळसुर लघु प्रकल्पातील अतिरिक्त पाणी तुरोरी मध्यम प्रकल्पात घेऊही लागले व पावसाचे प्रमाण कमी झाले तरी या कालव्यामुळे तीन वेळा तुरोरी मध्यम प्रकल्प ओव्हर फूल ही झाले होते. पण पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कालव्यात गाळ पडून व झाडे झुडपे वाढून कोळसुर लघु प्रकल्पातील अतिरिक्त पाणी येत नाही. त्यामुळे २०१२-१३ ला शेतकऱ्यांनी वर्गणी करून गाळ काढला होता.

त्यानंतर बरेच वर्षे पाणी येतही होतं व गेल्या चार वर्षांत पावसाचे प्रमाण चांगले होते त्यामुळे गेल्या चार वर्षांत तुरोरी मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहत होते पण यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले व जूलै महिन्यातच कोळसुर लघु प्रकल्प भरून सांडवा वाहू लागला. त्यामुळे तुरोरी मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना जोड कालव्यातून पाणी येत नसल्याचे व पुन्हा कालवा नादुरुस्त झाल्याचे लक्षात आले.

त्यातच तुरोरी मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने धरणातून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे, त्यामुळे तुरोरीसह परिसरातील आष्टा, मळगी, गुरुवारी, दाबका, चिंचकोट, मुळज, बेडगा, डिग्गी आदी शिवारातील हजारो हेक्टर वरील ऊसाचे क्षेत्र पाण्या अभावी वाळून जाण्याच्या मार्गावर आहे.

त्यामुळे संजय जाधव (पंच), राजकुमार माणिकवार, अशोकराव जाधव-कारभारी, व्यंकट पवार, बालाजी जाधव,पवन जाधव, काशिनाथ गायकवाड, व्यंकट कारभारी,अॅड सुधिर पवार , हरिदास पवार , सुभाष गायकवाड, विजयकुमार शिंदे, श्रीरंग पवार आदी शेतकऱ्यांनी जोड कालवा दुरूस्त करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT