मंठा : तुषार सिंचनाद्वारे पिकास पाणी देताना. 
मंठा : तुषार सिंचनाद्वारे पिकास पाणी देताना.  
मराठवाडा

पावसाअभावी पिकास पाणी देताना तारांबळ 

कृष्णा भावसार

मंठा (जि. जालना) -  तालुक्‍यात जवळपास एक महिन्यापासून पाऊस नसल्याने खरिपाची सोयाबीन, रब्बी तूर, कापूस, उडीद मूग जळून जात असून रिमझिम पावसावर वाढलेल्या मोजक्‍याच पिकांस पाणी देताना शेतकऱ्यांची तारांबळ उडत असून खर्च वाढत आहे. 

मंठा तालुक्‍यात पावसाळा संपत आला आहे, तरीही एकही दमदार पाऊस झाला नाही. रिमझिम पडलेल्या पावसावर खरिपाच्या पिकाची थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे; परंतु जवळपास पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची पिके जळून जात आहेत.

तालुक्‍यातील बहुतेक विहिरी व जलसाठे कोरडे पडले आहेत. तर तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी शेततळे तयार केले आहे; परंतु मागील तीन-चार वर्षांपासून शेततळ्यात पाणी साठले गेले नाही. पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पिकास पाणी देणे शक्‍य नाही. तरी देखील काही मोजकेच शेतकरी थोडेफार तरी पीक हाती लागावे म्हणून पीक लागवड केलेल्या क्षेत्रापैकी किती क्षेत्रास पाणी पुरेल याचा अंदाज पाहून विहिरीच्या पाण्याचा चार-पाच वेळेस उपसा घेऊन थोडेथोडे पाणी मोजक्‍याच क्षेत्रातील पिकांस देत आहेत. 

कापूस पिकास ठिबक सिंचनाद्वारे, तर सोयाबीन पिकास तुषार सिंचनच्या साह्याने पाणी देत असून ग्रामीण भागात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकास पाणी देण्याकरिता शेतात जावे लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT