मराठवाडा

ऐन दिवाळीत चोरट्यांचे 'लक्ष्मी'पूजन

सकाळवृत्तसेवा

लातूर : दिवाळीमुळे अनेकजन आपापल्या गावी जातात. त्यामुळे बरीच घरे बंद असतात. अशा घरावर चोरट्यांचे बारीक लक्ष होते. त्यामुळेच शहरातील जुना औसा भागातील घर फोडून चोरट्यांनी 20 हजार रुपयांचा ऐवज पळवला. तर सोन्याच्या दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन एका महिनेने 80 हजार रुपयांचे मिनी गंठण पळवले. घरातून सोने पळवणारा अद्याप पोलिसांच्या हाताला लागला नसला तरी दुकानात चोरी करणाऱ्या महिलेचा शोध घेऊन पोलिसांनी तिला अटक केले आहे. 

भूसार लाईन परिसरात सोन्याचे जुने दुकान समजल्या जाणाऱ्या ताथोडे सराफ दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने एक महिला आली. मालक आणि कामगाराची नजर चुकवून मिनी गंठण चोरले. त्यानंतर महिला दुकानातून पसार झाली. ही घटना दिवाळीचा पहिला दिवस समजल्या जाणाऱ्या वसुबारस (ता. 4) दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत 51 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन महिलेला अटक केले. सुवर्णभारती गुळवे (वय 21) असे या महिलेचे नाव असून तिच्याकडे मिनी गंठणबरोबरच इतर ठिकाणी चोरी केलेला एकूण 76 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सराफ दुकानात चोरी केलेल्या चोरट्याचा शोध लागला असला तरी औसा रस्ता भागात घरातून सोने, लक्ष्मीचे चांदीचे शिक्के आणि रोख रक्कम पळविणारा चोर अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. ही घटना दिपावली पाडव्या दिवशी (ता. 8) घडली. या प्रकरणी दिलीप व्यंकट बिराजदार (वय 58. रा. स्नेह नगर) यांनी विवेकानंद चौक पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी (ता. 9) तक्रार दाखल केली. बिराजदार कुटूंबिय घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. नेमकी हीच वेळ साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे पाच ग्रॅमचे झुमके, चांदीचे शिक्के आणि रोख सात हजार रुपये पळवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT