आकांक्षा
आकांक्षा  
मराठवाडा

कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली रक्तबंबाळ 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - सूतगिरणी भागातील काबरानगर मार्गावर असलेल्या मैदानातील कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. या मैदानावर शनिवारी (ता. नऊ) दुपारी आठ-दहा कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय चिमुकलीला घेरून लचके तोडत फरफटत नेले. परिसरातील नागरिक वेळीच धावल्याने चिमुकलीचे प्राण वाचले. आकांक्षा सागर शेजवळ असे जखमी मुलीचे नाव असून, तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

इंदिरानगर भागातील रहिवासी कविता सागर शेजवळ या विभागीय क्रीडा संकुलाच्या मागील बाजूस काबरानगर-इंदिरानगरच्या रस्त्यावरील मैदानावर दुचाकी शिकत होत्या. त्यांची मुलगी आकांक्षा मैदानावर आईसोबत होती. ती खेळताना धावली आणि परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या टोळीचे लक्ष या चिमुकलीकडे गेले. त्यांनी तिच्यावर झडप घातली. काही कळण्याच्या आतच कुत्र्यांनी तिचे लचके तोडून फरफटत न्यायला सुरवात केली. आकांक्षा भेदरून सैरावरा पळाली. मात्र, कुत्र्यांच्या तावडीतून तिला सुटता येत नव्हते. तिने जिवाचा आकांत करून आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तिच्याकडे धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावले. आकांक्षाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. 
 
घाटीत एआरव्हीची टंचाई 
आकांक्षाला बालरोग विभागाच्या वॉर्ड 24 मध्ये एआरएसची लस देण्यात आली. मात्र, एआरव्ही उपलब्ध नसल्याने ती पालकांना खासगीतून विकत आणण्यासाठी धावपळ करावी लागली. गेल्या अनेक दिवसांपासून ऍण्टी रेबीज व्हॅक्‍सीन (एआरव्ही) घाटीत उपलब्ध नाही. महापालिकेच्या क्षेत्रातील कुत्र्यांनी चावा घेतलेले दीडशेहून अधिक रुग्ण घाटीत महिन्याकाठी दाखल होतात. मात्र, महापालिका एआरव्ही देत नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. 
  
ग्रेड थ्रीचा चावा 
आकांक्षाला कुत्र्यांनी डाव्या हातासह उजवा पाय, पाठीला अनेक ठिकाणी खोलवर चावे घेतले आहेत. त्यामुळे हे ग्रेड थ्रीमधील रुग्ण असून पुढील 24 तास डॉक्‍टरांच्या निगराणीत ठेवावे लागेल, असे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT