file photo 
मराठवाडा

मेनबत्या लावा पण, विद्युत उपकरणे बंद करू नका : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा

परभणी :  पंतप्रधानांनी  रविवारी (ता.पाच) केलेल्या आवाहना प्रमाणे सर्वांनी घराच्या दरवाज्यातून मेनबत्या लावाव्यात परंतू, या काळात घरातील विद्युत उपकरणे बंद करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (ता.चार) केले आहे.

कोरोना विषाणुचे संकट संपूर्ण जगात आहे. त्यामुळे या विरोधात स्वविलगीकरण, सामाजिक अंतर राखण्याची कृती करून निर्धारपूर्वक लढण्याचे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी पाच एप्रिल या दिवसाची निवड केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटापासून दुर जाण्याचे सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लॉकडाउनची घोषणा देशात व राज्यात करण्यात आली आहे. या काळात परभणी जिल्ह्यातील जनतेने मोठे सहकार्य केले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले. 

सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडू नये
परभणी जिल्ह्यातील जनतेने ता. २२ मार्च रोजी जनता कर्फ्युचे १०० टक्के पालन केले. त्यानंतर आता येत्या रविवारी अर्थात ता. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता परभणी जिल्ह्यातील जनतेने स्वेच्छेने ९ मिनिट द्यायची आहेत. या तारखेस रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट स्वेच्छेने बंद करून बाल्कनी किंवा दरवाज्यासमोर मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश लाईट लावावा. तथापी हे करत असतांना रस्त्यावरील पथदिवे, घरातील फ्रिज, एसी, टिव्ही व इतर विद्यूत उपकरणे बंद करू नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे. या काळात सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडू नये. कुणीही रस्त्यावर येऊ नये असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


२३८ संशयीत रुग्णांची नोंद
शनिवारी (ता.चार) परभणी जिल्ह्यात २३८ संशयीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. १८८ जनांचे स्वॅब घेतले आहेत. त्यापैकी १६३ निगेटीव्ह असून १० स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. अद्यापही कोरोना विषाणुचा एकही रुग्ण जिल्ह्यात सापडला नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मिठाई विकत घेण्याआधी हा व्हिडिओ पाहा ! आवडीने कचोरी विकत घेतली, घरी जाऊन पॅकेट उघडून पाहिले तर... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Heat Risk : शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ; आयआयटीएमचा अहवाल

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Marathi News Live Updates : राज्याचे आरोग्यमंत्री अमरावतीत दाखल, डफरिन रुग्णालयाची करतायेत पाहणी

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

SCROLL FOR NEXT