मराठवाडा

मराठवाड्यातील मराठा "अतिमागास' 

संजय मिस्कीन

मुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र अत्यंत विदारक स्थिती अहवालातून समोर आली आहे. मराठवाड्यातील मराठा समाज इतर भागांतील मराठ्यांसह मागासवर्गाहूनही अतिमागास असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदवला आहे. शेती-संस्कृतीसह अन्न व निवाऱ्यापासूनही अनेक कुटुंबे वंचित असल्याचे आयोगाला आढळून आले आहे. त्यामुळेच आयोगाने मराठवाड्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यांचे सर्वेक्षण करत आठही जिल्ह्यांत जनसुनावण्यांचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. 

पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रास कोकणातील मराठा समाज मागास असल्याचे आयोगाने शिक्‍कामोर्तब केले. मात्र, मराठवाड्यातील मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्थिती चिंताजनक असल्याचे अनेक दाखले आयोगाला आढळले आहेत. अनेक गावांत मराठा समाजाच्या कुटुंबांना राहण्यास घर नाही. अल्पभूधारक असल्याने उत्पन्न नाही. दुष्काळाचे दुष्टचक्र असल्याने पाणी नाही. पाणी नसल्याने उद्योग नाही. ते नसल्याने रोजगारही नाही. त्यामुळे, मराठवाड्यातील मराठा समाजाला रोजगाराच्या संधीही नसल्याचे आयोगाने नमूद केले आहे. 

मराठवाड्यातील समस्या इतर विभागांपेक्षा अत्यंत वेगळ्या असल्याने सर्व जिल्ह्यांत सर्वेक्षण व जनसुनावण्या घेण्यात आल्या. साधारणत: 1500 लोकसंख्येची गावे निवडून तिथल्या मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण केले. संबंधित गावांतील इतर समाजाच्याही भावना जाणून घेत मराठा आरक्षणाबाबतची भूमिका आयोगाने समजून घेतली. मराठाव्यतिरिक्‍त इतर समाजाच्या 90 टक्‍के लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पूर्णत: समर्थन दिले. त्यातूनच आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवत सरकारला अहवाल सादर केला आहे. 

शिक्षण, रोजगार, आर्थिक दारिद्य्र यासह सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातही मराठवाड्यातील मराठा समाज इतर भागापेक्षा अत्यंत मागास असल्याचे समोर आले आहे. 

राज्यातील मराठ्यांचे मागासलेपण (टक्‍क्‍यांत) 
- 50 हजार ते 1 लाख उत्पन्न : 18.65 
- 2,40,000 पर्यंत उत्पन्न : 21.68 
- 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न : 51.14 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT