मराठवाडा

सोयगावात आरोग्य विभागाच्या कानउघाडणीनंतर नगरपंचायतीला जाग

सकाळवृत्तसेवा

सोयगाव : सोयगाव शहरात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाने डेंगूने तीन दिवसांपासून धुमाकूळ घातला असून तापाने रुग्णाचा सोयगावला उपचार न झाल्याने शुक्रवारी दुपारी जळगावच्या सामान्य रुग्णालयात डेंगूने मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान तरुणाच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसापासून गाढ झोपेत असलेल्या नगरपंचायतीची आरोग्य विभागाने शहराच्या अस्वच्छतेबाबत कानउघाडणी केली आहे.

धनराज रमेश इंगळे(वय ३२)असे डेंगू तापेने मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर पहाटे सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार न झाल्याने त्याला तातडीने जळगावच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचाराच्या तासाभरातच त्याचा मृत्यू झाला. मृताचे जळगावच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरात पंधरा दिवसापासून अस्वच्छतेचे थैमान पसरले असल्याने शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव झाला आहे,वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाने शहरात आठवडाभरापासून तापेची साथ पसरली,तापेचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे.परंतु संबंधित नगरपंचायतीकडून स्वच्छतेबाबत कोणतीही उपाय-योजना हाती घेण्यात आली नसल्याने शहराची अस्वच्छता नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी ठरली आहे. नगरपंचायत प्रशासन मात्र डोळे झाकून आहे. शहरातील गटारींची वाढती दुर्गंधी रस्तावर येवून पडली आहे.गटारींची स्वच्छता न करण्यात आल्याने दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठा झाला आहे.शहरातील डासांचा वाढलेला प्रादुर्भाव असल्याने शहरवासीयांना तापाच्या साथीने विळखा घातला आहे.

दरम्यान, संबंधित नगरपंचायतीच्या मुख्याधिकारयाकडून शहरातील स्वच्छतेबाबत कोणताही उपाय-योजना हाती न घेण्यात आल्याने दुर्गंधी वाढतच आहे,शहर स्वच्छतेसाठी वर्षभराचा ४६ लाखांचा ठेका संबंधित ठेकेदाराला देण्यात आला असताना मोजक्याच भागात रस्त्यावरून स्वच्छता केली जाते. त्यामुळे रोगराईला शहरात आमंत्रण दिले जाते. 

डेंगूच्या तापाने एका रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला असतानाच दुसरीकडे शहरातील पाच जणांना डेंगूची लागण झाली असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान डेंगूच्या तापाने मृत्यू झालेल्या धनराज इंगळे यांच्या कुटुंबियांचे रक्तनमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी घेण्यात आले असून औरंगाबाद शासकीय रुग्णालयात रक्तनमुने पाठविण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी सांगितले.

शासकीय औषधसाठा कोरडाठाक

शहरातील एकमेव असलेल्या ग्रामीण रुग्णालयात औषधसाठा कोरडाठाक झालेला असल्याने पंधरा दिवसापासून रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात येत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT