Education Department New Activities, Let's See Toilet
Education Department New Activities, Let's See Toilet 
मराठवाडा

आता शौचालयाच्या सफाईची जबाबदारीही शिक्षकांवर

संदीप लांडगे

औरंगाबाद - शाळेत स्वच्छता दिन साजरा करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे. या अंतर्गत चला पाहू या शाळेचे शौचालय हा उपक्रम जिल्हाभरातील शाळेत राबविण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत आता शौचालयांची स्वच्छता करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी गावातील सरपंच आणि इतर प्रमुख नागरिकांना बोलवण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत एक मुलांसाठी, एक मुलींसाठी असे शौचालय असावे, असा नियम आहे; मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये एकच शौचालय असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यातील 40 टक्के शौचालय वापरा योग्यच नसल्याचे जिल्हा परिषद सदस्यांनी  सांगितले. जिल्ह्यात अनेकवेळा दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यामुळे शाळांमध्ये शौचालय आहेत; पण पाणी नाही, त्यात तुटलेल्या खिडक्‍या, मोडके दरवाजे,  कडी-कोंयडा नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून अशा शौचालयाचा वापरच होत नाही.

राबविणार हे कार्यक्रम
शिक्षण विभागातर्फे शाळांसाठी रोज एक आदेश काढून त्याचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. दिवाळीच्या सुटीची विश्रांती संपतेना तोच  शिक्षण विभागाकडून रोज एक आदेश काढला जातो. यावेळी चला पाहूया शाळेचे शौचालय या उपक्रमाअतंर्गत विद्यार्थ्यांना शाळेचे शौचालय दाखवण्याच्या सूचना शाळांना दिली आहे.

या  उपक्रमाअंतर्गत शाळेतील शौचालय स्वच्छ वापरायोग्य करून स्वच्छता दिन साजरा करावा, शाळेतील बंद शौचालय उघडावे, स्वच्छतेवर एकांकिका सादर करावी, शौचालय कसे वापरावे  याची भित्तिपत्रके तयार करावीत, स्वच्छतेबाबत प्रश्नमंजूषा स्पर्धा घ्यावी, शौचालय दुरुस्तीसाठी देणगी गोळा करावी अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
 
शिक्षकांचे त्रांगडे
आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांकडून कोणतेही काम करून घेऊ नये असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा व शौचालयांची स्वच्छता करण्याची जबाबदारी  शिक्षकांवर आहे; मात्र शिक्षकांकडून या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने शौचालयांची दुरवस्था झाल्याचे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT