st bus esakal
मराठवाडा

सेलू : एसटी संपामुळे ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल बावीस महिन्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू

विलास शिंदे - सकाळ वृत्तसेवा

सेलू : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल बावीस महिन्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू होत असतांनाच मागील एक महिण्यापासून एसटीचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत येता येत नाही. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल बावीस महिने संपूर्ण शाळा बंद होत्या. नंतर शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर (ता.०१ ते ता.२१) नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर (ता.२२) नोव्हेंबरपासून सर्व वर्ग नियमित सुरू करण्यात आले. आता ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना सुरळीत शिक्षण सुरू झाले असे वाटत होते.

मात्र महामंडळ कर्मचार्‍यांच्या संपामुळे तब्बल ३५ दिवसांपासून बस वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातून शहरात आणि आपल्या गावातून दुसऱ्या गावात असलेल्या माध्यमिक शाळेत जाण्यासाठी मानव विकासची बस वाहतूक देखील संपामुळे बंद असल्याने सहावी ते बारावीमध्ये शिकत असलेल्या सुमारे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न बिकट झाला आहे.

ग्रामीण विद्यार्थांना शहरी भागातील शाळांमध्ये येता येत नसल्याने शाळा ओस पडल्या आहेत. दुसरीकडे खासगी वाहतूकदारांनी तिकीट भाडे दुप्पट केल्याने पालकांची चांगलीच गोची झाली आहे. अगोदरच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुलांना रोज खासगी वाहतुकीने शाळेत पाठवण्याचा खर्च त्यांना परवडणारा नाही. तसेच शहरातील खासगी गुरुकुलमध्येही फी भरणे अवघड असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब विद्याथ्यांचे शैक्षणिक जीवन धोक्यात आले आहे.

तालुक्यात प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद व खासगी शाळांची संख्या १८९ इतकी असून जवळपास ३५ हजार विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण आहेत. यात आठ ते दहा हजार विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी वर्गातील असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Monsoon : जळगावात यंदा १०७ टक्के पाऊस; माॅन्सून माघारी, अतिवृष्टी न झाल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा

Diwali Faral Tips: दिवाळी फराळ टेस्टी आणि कुरकुरीत करायचा आहे का? मग 'या' 5 टिप्स नक्की वापर!

Jalgaon Crime : एल.के. फार्म हाउस सायबर फसवणूक: हॅण्डलर आणि मास्टरमाईंडविरोधात 'लूक आउट' नोटीस जारी

वडील गेले, लग्न नाही, मुलं नाहीत... हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं कोण असेल त्यांची म्हातारपणाची काठी?

Cough syrup issue: कफ सीरप प्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री नागपुरात! राहुल गांधींसह तमिळनाडू सरकारवर निशाणा

SCROLL FOR NEXT