औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी नागनाथाची शासकीय महापूजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डाॅ.कृष्णा कानगुले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.  सकाळ
मराठवाडा

Jyotirling : पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांविना नागनाथाची पूजा

दत्तात्रय शेगूकर

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : येथील आठवे ज्योतिर्लिंग (Eighth Jyotirling) नागनाथ मंदिरात (Nagnath Temple) श्रावणातील पहिल्या सोमवारी (ता.नऊ) नागनाथाची शासकीय महापूजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डाॅ.कृष्णा कानगुले यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी सहा वाजता करण्यात आली. औंढा नागनाथ मंदिर कोरोना संसर्गजन्य (Corona) रोगाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी पुजारी व शारीरिक अंतर ठेवून संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार डाॅ.कानगुले व त्यांच्या पत्नी सुरेखा यांच्या हस्ते शासकीय (Aundha Nagnath) महापूजा झाली. यावेळी त्यांनी देशावर ओढवलेले कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे नागनाथाला घातले. वेदपठण पुजारी नारायण भोपी, पद्माक्ष पाठक, नागनाथ जोशी, रामेश्वर क्षीरसागर यांनी केले. यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक वैजेनाथ पवार, बापुराव देशमुख उपस्थित होते.

दरम्यान, श्रावणातील सोमवारी येथे कावड दिंड्या, पताका घेऊन हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलून जातो. परंतु यंदा कोरोनाच्या साथीमुळे सर्व काही बंद असल्याने व संसर्ग टाळण्यासाठी मंदिरेही बंद ठेवण्यात आल्याने यावर्षी श्रावणातील पहिल्या सोमवारी मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच देवस्थानच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे, की कोरोनाच्या संकटामुळे नागनाथ मंदिर हे बंद आहे. तरी भाविकांनी नागनाथ परिसरामध्ये गर्दी करू नये असे आवाहन देखील डाॅ.कानगुले यांनी केले आहे. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक आनिल लांडगे, पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, एसआरपीएफ तुकडी व पोलिस कर्मचारी यांनी मंदिर परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT