Corona News.jpg
Corona News.jpg 
मराठवाडा

जालन्यात लॉकडाऊनमध्येही वाढतोय कोरोनाचा प्रसार, आज ८० बाधित

उमेश वाघमारे

जालनाः शहरात मागील अकरा दिवसांपासून कडकडीत लॉकडाऊन असतांनाही कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. गुरूवारी (ता.१६) जिल्ह्यात तब्बल ८० कोरोना बाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ही एक हजार १८२ वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान ४५५ जणांचे स्वॅब नमून प्रलंबित आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जालना शहरात आजघडीला सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण आहेत. त्यामुळे जालना शहर ता. पाच जुलैच्या रात्री बारा वाजेपासून कडकडीत लॉकडाऊन लागू आहे. मात्र, लॉकडाऊनमध्येही कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरूवारी (ता.१६) ३८८ जणांचे कोरोनाचा चाचणीचे आहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात २९५ जणांचे अहलाव हे निगेटीव्हा प्राप्त झाले आहे. तर १३ जणांचे अहवाल हे बाद झाले असून तब्बल ८० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.  

दरम्यान ४५५ स्वॅब नमून्यांचा अहवाल अजून प्रलंबित आहेत. या स्वॅबचा अहवाल संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संध्यकाळपर्यंत कोरोना बाधितांची संख्य अजून वाढण्याची शक्यता आहे. सध्या जालना शहरामध्ये ता. २० जुलैच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन लागू आहे. शहरातील कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी पुढील चार दिवस तर जालना शहरातील नागरिकांनी घरा राहून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करणे अपेक्षित आहे.

औरंगाबादेत ६६ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३ हजार ६४१ रुग्णांवर उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात आज (ता.१६) सकाळच्या सत्रात ६६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात जिल्ह्यातील एकूण १ हजार पाच जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. आज बाधित रुग्णांपैकी २१ शहरातील, ३१ ग्रामीण भागातील असून अँटीजेन चाचणीद्वारे १४ जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले.
आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५१० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ५ हजार ४९९ बरे झाले. एकूण ३७० जणांचा मृत्यू झाला. आता  ३ हजार ६४१ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT