hingoli
hingoli  sakal
मराठवाडा

Hingoli News : अकोला-पूर्णा विद्युत इंजिनद्वारे रेल्वे कधी धावणार? ; विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : अकोला ते पूर्णा या रेल्वे मार्गावर विद्युत इंजिनद्वारे रेल्वे कधी सुरू होणार याची प्रतीक्षेत आता येथील प्रवासी आहेत. यासोबतच या मार्गाचे दुहेरी करण करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

या रेल्वे मार्गाने अकोला ते लोहगड, लोहगड ते वाशीम, व वाशिम ते हिंगोलीपर्यंत रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर २४ सप्टेंबर २०२२ अकोला ते हिंगोली या १२७ किलोमीटरपर्यंत नरखेड ते काचीगुडा रेल्वे विद्युत इंजिनद्वारे यशस्वीपणे चालविण्यात आली.

दोन मार्च २०२३ रोजी सिंकदराबाद येथील रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता पी. डी. मिश्रा व अतिरिक्त डीआरएम राजेंद्र मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा-हिंगोली-पुर्णा रेल्वे मार्गावर मिरखेल ते हिंगोलीपर्यंत शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने विद्युत इंजिनद्वारे सुरक्षा चाचणी झाली. यामध्ये एक इलेक्ट्रिक इंजिन, एक ओचई इंजिन व एक डिझेल इंजिन वापरण्यात आले होते.

दरम्यान, पूर्णा आऊटर ते मिरखेल दहा किलोमीटरपर्यंत विद्युत खांब उभे करुन वायरिंग जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नांदेड ते पूर्णा व पूर्णा ते परभणीपर्यंत विद्युतीकरणाचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून अकोला ते पूर्णा रेल्वे मार्गाने विद्युत इंजिनद्वारे रेल्वे चालू करण्याची तसेच या मार्गाचे दुहेरीकरण करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहु, प्रवीण पडघन यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT