Ration Card
Ration Card 
मराठवाडा

पात्र कुटुंबांचा घेतला जातोय शोध

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद - विधानसभेच्या निवडणुका जवळ येताच प्रशासनाकडून गोरगरिबांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला जात आहे. सर्व पात्र कुटुंबांना शंभर टक्‍के शिधापत्रिका, शंभर टक्‍के धान्य वाटप व गॅस कनेक्‍शन देण्यासाठी १५ जुलैपासून २५ ऑगस्टदरम्यान पुरवठा विभाग विशेष मोहीम राबवत आहे. आचारसंहितेपूर्वीच गरजवंतांना रेशन मिळेल, याची काळजी घेण्यात येत आहे.

मागील काही वर्षांपासून ऑनलाइन कारभार सुरू असल्याचे सांगितले जाते. यामुळे धान्याचा काळाबाजार थांबला असल्याचाही दावा केला जातो. मात्र, पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळतो का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येतो.

दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आलेल्या सूचनानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्व तालुक्‍यांतील रास्त भाव दुकानास संलग्न करण्यात आलेल्या लाभार्थी यांच्याकडून त्यांच्या पात्रतेच्या निकषानुसार म्हणजे पिवळी, केसरी आणि पांढरी शिधापत्रिका उपलब्ध आहे की नाही, याचा आढावा ग्रामदक्षता समिती, सदस्य सचिव तथा तलाठी ग्राम दक्षता समिती यांच्यामार्फत खात्री करावी, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत त्यांची यादी करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेऊन रास्त भाव दुकानदार यांच्यामार्फत सर्व अर्ज जमा करून घ्यावे. हे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करून घ्यावे, प्राप्त झालेले शिधापत्रिकाचे सर्व अर्ज १५ जुलैपर्यंत डाटा एंट्री करावी. त्यानुसार सर्वांना शिधापत्रिका वाटप कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. हे सर्व काही आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी पात्र असलेल्या कुटुंबाचा शोध घेतला जातोय हेदेखील काही कमी नाही, अशीही चर्चा आहे. 

दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. त्या अनुषंगाने गरजवंतांचा शोध पूर्ण होऊन त्यांना धान्य, उज्ज्वला गॅसचा लाभ मिळेल, असे चित्र सध्या आहे. शोधमोहितेतून समोर आलेल्या पात्र कुटुंबांचा डाटा तयार करण्याचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT