good bye
good bye 
मराठवाडा

‘थर्टीफस्‍ट’निमित्त खवय्यांसाठी परजिल्ह्यातील कूक येथे दाखल

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः सरत्‍या वर्षाच्या अखेरच्या दिवसाला निरोप देण्यासाठी युवापिढीसह अनेक जण सज्‍ज झाले असून यासाठी अनेकांनी हॉटेल, ढाब्यावर जावून व्हेज, नॉनव्हेज तसेच नास्‍ता, मंच्युरिअन, दूधमलाई आदी पार्ट्याचे नियोजन ठरल्याने हॉटेलसह ढाबे चालकांनी देखील दोन दिवसांपासून आकर्षक विद्युत रोषणाई करून खास मेनू तयार करण्यासाठी बाहेरून कूक बोलावले आहेत. 

सरत्‍या वर्षाचा शेवटचा दिवस थर्टीफस्‍ट म्हणून साजरा केला जातो. जुने वर्ष संपून नवीन वर्ष लागत असल्‍याने मागच्या वर्षाला निरोप व येणाऱ्या वर्षाचे स्‍वागत करण्यासाठी युवापिढी सज्‍ज झाली असून अनेकांनी हा दिवस कसा साजरा करायचा त्‍याचे अनेक दिवसांपासून नियोजन केले आहे. मंगळवारी (ता.३१) हा दिवस साजरा करण्याचा बेत ठरल्याने प्रत्‍येकाचे वेगळवेगळे ग्रुप तयार झाले आहेत. 

धार्मिक स्‍थळांना भेटी देण्याचे नियोजन 
लहान मुलांसह वृद्धदेखील सहभागी होत आहेत. काहींनी घराच्या गच्चीवर, तर काहींनी शेताच्या आखाड्यावर, हॉटेल, ढाब्यावर हा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. तर काही जणांनी धार्मिक स्‍थळांना भेटी देण्याचे नियोजन केले आहे. या दिवसाचे महत्त्व पाहून शहरातील हॉटेल व ढाबे चालकांनी युवकांचे आकर्षण करण्यासाठी हॉटेल ढाब्याच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. 

अनेक हॉटेलवर खास मेनू 
खास मेनू तयार करण्यासाठी बाहेरून कूक बालावले आहेत. याशिवाय शहरातील चॉयनिज सेंटर, दूधमलाई सेंटर, स्‍वीट मार्ट आदी ठिकाणी पार्टीचे नियोजन झाले आहे. यातील अनेकांना व्हेज व नॉनव्हेज हॉटेलवर जावून जेवणाचा बेत आखणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याचा अंदाज पाहून अनेक हॉटेलवर खास मेनू तयार करण्यात येणार आहेत. यात व्हेज मशरुम नुडल्‍स, व्हेज नुडल्‍स, शिजवन नुडल्‍स, टॉमेटो सुप, मशरुम सुप, रोस्‍ट पापड, मसाला पापड, चिलीकट पकोडा, आलु पकोडा, मिक्‍स पकोडा, चना रोस्‍ट, व्हेज ६५, पनेर मच्युरिअन, मलई मेथी, बैंगन मसाला, व्हेज स्‍पेशन, व्हेज लाजवान, व्हेज शालीमार, पनिर हैदराबादी, पनेर महाराजा, दाल तडका, दाल कोल्‍हापुरी आदींचा समावेश आहे. 

नॉनव्हेज डिशची चांगली मागणी होणार 
नॉनव्हेज डिशची चांगली मागणी होणार यांचा अंदाज पाहुन विविध डिश तयार करण्यात आल्या आहेत. यात चिकन चिली, चिकन मचुरिअन, चिकन ६५, मटन फ्राय, मटन बॉईल, चिकन फ्राय, चिकन वऱ्हाडी, चिकन हंडी आदींचा समावेश आहे. चपाती, ज्‍वार रोटी, तंदूर रोटी, पराठा, आलु पराडा आदी आहेत. तसेच प्‍लेन राईस, जिरा राईस, दाल खिचडी हे देखील उपलब्ध झाले असून ऑर्डरप्रमाणे ते विक्रीस दिले जाणार आहेत. 

‘कोल्‍हापुरी पॅटर्न’नुसार मेनू
कोल्‍हापुरात अनेक व्हेज व नॉनव्हेज पार्टीत एकापेक्षा एक सरस खाद्यपदार्थ तयार केले आहेत. सर्वत्र ‘कोल्‍हापुरी पॅटर्न’ प्रसिद्ध असल्‍याने हव्या त्या वेळेस पाहिजे तसा पदार्थ तयार करण्याचे खास प्रशिक्षण घेतल्‍याने अनेक ठिकाणी बोलावणे येते, त्‍याप्रमाणे यावर्षी हिंगोलीत आलो आहे.
- गफार वस्‍ताद, कूक.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियाचे शेअर्स वधारले, नेस्लेचा शेअर घसरला

Star Sports Hits Back Rohit Sharma : 'हिटमॅन' रोहित शर्माच्या आरोपांवर स्टार स्पोर्ट्सने केला पलटवार; म्हणाले...

Gold Rate: सोने-चांदी तोडणार सर्व रिकॉर्ड? इराण ठरणार कारणीभूत; जाणून घ्या भाव

Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT