paithan
paithan 
मराठवाडा

ब्रह्मगव्हाण योजनेच्या कामाची अधीक्षक अभियंत्यांकडून पाहणी 

सकाळवृत्तसेवा

जायकवाडी : जायकवाडी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनच्या सुरू असलेल्या पंपगृहाची व उदग्रहन कामाची पाहणी शुक्रवारी (ता.17) अधीक्षक अभियंता बबनराव जटाळे यांनी केली. 

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लागण्याचे संकेत असून या योजनेमुळे पैठण तालुक्‍यातील 55 गावांच्या शेतजमिनीसाठी सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर होऊ शकते. पैठण जायकवाडी प्रकल्पातून खेर्डा प्रकल्पापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या इसारवाडी येथील क्रॉसिंग पाईपलाईनच्या कामाचीही अधीक्षक अभियंता जटाळे यांनी पाहणी केली, तेथील कामकाजाची त्यांनी माहिती घेतली. 

या योजनेच्या कालवा क्रमांक एकचे काम अकरा किलोमीटरपर्यंत झाले असून कालवा क्रमांक दोनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. यावेळी कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, सहायक कार्यकारी अभियंता कृष्णा घुगे, मयुरा जोशी, सोनाई कन्स्ट्रक्‍शनचे कंत्राटदार रमेश अहिरराव, रविराज मराठे, शाखा अभियंता नुसरत बेग, उल्हास चव्हाण, विजय वाघमारे, कैलास सगोरे, राकेश महाले, जयेश त्रिभुवन, भूषण मोरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जानेवारी 2018 अखेर खेर्डा प्रकल्पात ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले असून सद्यस्थितीत या प्रकल्पाचे काम समाधानकारक व प्रगतीपथावर असल्याचे अधीक्षक अभियंता बबनराव जटाळे यांनी सांगितले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT