Hingoli News
Hingoli News 
मराठवाडा

लग्न होऊनही संसार थाटता येईना

मंगेश शेवाळकर

हिंगोली :  राज्यात जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला आहे, शिवसेना-भाजप युतीकडून पंधरा दिवस होऊनही सत्ता स्थापन झाली नाही. मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेना दोघेही रुसून बसल्याने, युतीची अवस्था म्हणजे लग्न होऊनही संसार थाटता येत नाही, अशी बिकट अवस्था झाल्याची टीका काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार  राजीव सातव यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली आहे.

राज्यातील सरकार स्थापनेच्या परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, राज्यात भाजप -शिवसेना युतीने व काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने एकत्र येऊन विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. या निवडणुकीत राज्यातील जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र, जनतेचा कौल असतानाही युतीकडून सरकार स्थापनेसाठी उशीर का लागत आहे? हा गंभीर विषय आहे. निवडणुकीपूर्वी भाजप व शिवसेनेमध्ये झालेल्या चर्चेनुसार दोघांनीही काम केले पाहिजे. त्यांचा साखरपुडा झाला, लग्नही झाले अन् संसार मात्र थाटला जात नाही. यामध्ये राज्यातील जनतेचे मोठे नुकसान होत आहे. 

सरकार गंभीर नाही

राज्यात एकीकडे परतीच्या पावसाने हाहाःकार उडवून दिला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. गत तीन-चार वर्षांपासून शेतकरी अस्मानी संकटांना सामोरे जात आहे. यंदा कपाशी, सोयाबीनची चांगली पीके बहरली होती. परंतु, परतीच्या पावसामुळे या पिकांची मोठ्याप्रमाणावर नासधूस झाल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झालेला आहे.  मात्र, या परिस्थितीत सरकार मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसत आहे. 

आश्‍वासनांची पूर्ती करावी

सत्तेसाठी सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता युतीच्या नेत्यांनी जनतेला अधिक काळ वेठीस न धरता सरकार स्थापन करून निवडणुकीच्या तोंडावर जनतेल्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे, अशी अपेक्षाही काँग्रेस नेते सातव यांनी व्यक्त केली आहे.
 
कोट
जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून काँग्रेस पक्ष विरोधीपक्षात बसण्यास तयार आहे. विधानसभेत काँग्रेस विरोधीपक्षाची भूमिका पार पाडणार असल्याचेही माजी खासदार सातव यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT