EX MLA Sahebrao darekar enters in NCP
EX MLA Sahebrao darekar enters in NCP 
मराठवाडा

Vidhan Sabha 2019 : भाजपला मोठा दणका; माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्यात मोठा दणका बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी आज (ता.15) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आष्टी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहे आजबे यांना साथ देणार असल्याचेही त्यांनी प्रवेश करताना स्पष्ट केले आहे.

माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजपला आष्टी मतदारसंघात मोठा दणका बसला असून याचा फटका आमदार भिमराव धोंडे यांना निवडणुकीत बसेल असे बोलले जात आहे.

25 हजार होमगार्डवर बेकारीची कुऱ्हाड

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की,  महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी सत्याधाऱ्यांकडुन गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येते आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्याकाळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत आहे.
 

आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब आजबे, भाजपचे माजी आमदार साहेबराव दरेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT