exchange of 2000 notes Queues formed in banks petrol pump jalna sakal
मराठवाडा

RS 2000 Note Exchange : दोन हजारांच्या नोटा बदलण्यास सुरुवात; नागरिकांच्या बॅंकेत लागल्या रांगा

जालना : नागरिकांच्या बॅंकेत लागल्या रांगा ; पेट्रोलपंपावर वाढला वापर

सकाळ वृत्तसेवा

जालना : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवारी (ता.२३) रांगा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. शिवाय पेट्रोल पंपावर ही दोन हजारांच्या नोटा ग्राहकांकडून देताना दिसून आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्याकाळात सर्वात मोठे चलन असलेल्या एक हजार तसेच पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. तर चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने तेव्हा दोन हजारांची नोट चलनामध्ये आणली होती. नोटबंदीच्या काळात चलनातून बाद झालेल्या नोटा जमा करण्यासह नवीन नोटा घेण्यासाठी बँकेवर लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते.

नोटबंदीच्या निर्णयानंतर सात वर्षानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट चलनातून मागे घेतली आहे. या दोन हजारांच्या नोटा ता. २३ मे ते ता.३० सप्टेंबर या दरम्यान बँकेतून बदलून घेण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली आहे. एका वेळी वीस हजार रुपयांच्या दोन हजारांच्या बँकेत जमा करणे किंवा बदलण्यास मुभा दिली आहे.

बँकेत मंगळवारपासून (ता.२३) दोन हजारांच्या नोट बदलण्यास सुरवात झाली. पाहिल्याच दिवशी दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासह बदलून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. शिवाय चलनात मागील अनेक दिवसांपासून न दिसणारी दोन हजारांच्या पेट्रोल पंपावर नागरिकांकडून देण्यात येत असल्याचे चित्र आले आहे.

नोटा जमा करण्यासाठी मोठा कालावधी

दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी मोठा कालावधी उपलब्ध करून दिला आहे. ता.३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत आहे. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी चार महिन्यांपेक्षा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी ही नोटा बँकेत जमा करण्यासह बदलून घेण्यासाठी बँकेत गर्दी न केलेली बरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT