file photo
file photo 
मराठवाडा

परभणीच्या पोखर्णीफाट्याजवळ स्फोटके जप्त; फौजदार चंद्रचुड हत्तेकर यांची कारवाई

अर्जून कच्छवे

दैठणा (जिल्हा परभणी)  ः रात्रीच्यावेळी चोरीच्या मार्गाने स्फोटके घेवून जाणाऱ्या दोघांना परभणी शहर वाहतुक शाखेचे फौजदार चंद्रचुड हत्तेकर यांनी बुधवारी (ता. 24) रात्री दीड वाजता पोखर्णी फाट्यावर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून स्फोटकाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी परळी तालुक्यातील दोघांवर दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी शहर वाहतुक शाखेचे फौजदार चंद्रचुड हत्तेकर यांच्यासह त्यांचे सहकारी बुधवारी (ता. 24) रात्री ग्रामीण भागातील गस्त करण्यासाठी गंगाखेड रस्तावर गेले होते. त्यावेळी पोखर्णी फाटा परिसरात दोन संशयीत इसम एका मोटारसायकलसह उभे असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी या दोघांना इतक्या रात्री कुठे जात आहेत अशी विचारणा केली. त्यांच्या मोटारसायकलवर सिमेंटच्या पोत्यात काही तरी ठेवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी पोत्यात काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी त्यात कपडे असल्याचे सांगितले.

परंतू फौजदार श्री. हत्तेकर यांना संशय आल्याने त्यांनी गाडीच्या खाली उतरून तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक जण पळून गेला. तातडीने एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या पोत्याची तपासणी केली असता त्यात जेलेटीन या स्फोटकाचे आठ पाकिटे आढळून आली. आरोपी सुभाष दगडु चव्हाण यांस ताब्यात घेत त्याला दैठणा पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी आरोपी सुभाष दगडु चव्हाण (रा. वडर कॉलनी, परळी) व मुकसींन नारायनसिंग कच्छवाह (रा. सिरसाळा ता. परळी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या आरोपीस गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास दैठणा पोलिस ठाण्याचे फौजदार श्री.आदोडे हे करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT