file photo
file photo 
मराठवाडा

या’ जिल्ह्यात मंत्रिपदासाठी दुष्काळी

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या इतिहासात जिल्ह्याला बोटावर मोजता येतील इतक्या वेळेसही मंत्रिपद मिळाले नाही. नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तरी जिल्ह्याला किमान एक तरी मंत्रिपद मिळावे व जिल्ह्याचा विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्य मंत्रिमंडळात सध्याच्या परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना फारसे स्थान मिळालेले नाही. राज्यात अपवाद वगळता काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षच सत्तेवर असून १९६२ पासूनच्या इतिहासात जिल्ह्यातील पाच किंवा चार मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींना अपवादानेच स्थान मिळाले आहे. आतापर्यंत केवळ सहा लोकप्रतिनिधींची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यातही सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधींची राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आली आहे. त्यामध्ये (कै.) रावसाहेब जामकर, (कै.) स. गो. नखाते, माणिकराव भांबळे, अॅड. गणेशराव दुधगावकर, श्रीमती फौजिया खान व विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांचा समावेश आहे. परभणी पेक्षा हिंगोली, जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नशिबवान ठरले असून बहुतांश वेळा या जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

महाविकासआघाडी सरकार ‘बॅकलॉग’ भरणार


भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे सरकार आले असते तर शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील (परभणी) व भाजपच्या मेघना साकोरे बोर्डीकर (जिंतूर) या दोन लोकप्रतिनिधींना संधी होती. तर आता महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे निश्चित झाले आहे. या विकास आघाडीचे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यात आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभेत शिवसेना पत्रप्रमुख व नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. राहुल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, मी पाहतो काय करायचे ते? असा शब्द दिला होता. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘तो’ एक कोण?


 त्यातच काँग्रेस पक्षाचे आमदार सुरेश वरपुडकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांची नावेदेखील समोर येत आहेत. काही त्यांनी त्यासाठी लॉबिंगदेखील सुरू केले आहे. आघाडीत हे तीनही पक्ष सहभागी असल्यामुळे सर्वांना तर संधी मिळणे अशक्य आहे. परंतु, प्रतिनिधित्व म्हणून एकाला संधी मिळण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. किमान एकाला संधी मिळेल, असे सूतोवाच श्री. दुर्राणी यांनी केले होते. ‘तो’ एक कोण? अथवा पुन्हा एकदा जिल्ह्याला हुलकावणी मिळते? हे लवकरच स्पष्ट होईल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT