Farmer celebrate Bailpola with Tractor 
मराठवाडा

बैलपोळा नव्हे, ट्रॅक्टरपोळा! (व्हिडिओ)

दीपक क्षीरसागर

आटोळा, जि. लातूर : बैलपोळा म्हणजे शेतीला उपयोगी पडणाऱ्या बैलांप्रत कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. पण लातूर जिल्ह्यातील आटोळा या गावी बैलांऐवजी चक्क ट्रॅक्टर्सची पूजा करून त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. हा आधुनिक काळातील नवा प्रकार वाटत असला तरी, त्याला दुष्काळी परिस्थितीची नाईलाजाची किनार आहे.

गावात पूर्वी किमान 500 बैलजोड्या होत्या. दिवसेंदिवस पाऊस कमी होत गेल्याने या बैलांना चारा घालून सांभाळणे जिकिरीचे बनत गेले. त्यामुळे बैल विकून गावात ट्रॅक्टर आणले गेले.

आता गावात शंभरेक बैलजोड्या कशाबशा शिल्लक आहेत. त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी तरुणांनी ट्रॅक्टरलाच बैलांप्रमाणे हार घातले, रिबिनी बांधल्या, त्यांची पूजा केली आणि गावातून वाजतगाजत मिरवणूकही काढली.

अर्थात तरुणांनी जरी यात पुढाकार घेतला असला तरी, गावातील वयोवृद्धांनी पूर्वीचे बैलबारदान्याचे वैभव आठवून हळहळ व्यक्त केली.

पावसाअभावी बैल विकले
गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे नापिकीला कंटाळून मी बैलाबारदाना मोडला. आता आम्ही ट्रॅक्टरने शेती करतो. त्यामुळे बैलांच्याऐवजी ट्रॅक्टरचाच पोळा साजरा केला.
- एक शेतकरी, आटोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT