file photo 
मराठवाडा

शेतकऱ्याने ‘का’ संपविली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माळझरा (ता. हदगाव) शिवारात शनिवारी (ता. २८) घडली. 

माळझरा (ता. हदगाव) येथील शेतकरी सूर्यभान सखाराम खोकले (वय ३५) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. कर्ज काढून ते दरवर्षी आपल्या शेतात पेरणी करीत होते. परंतु लहरी निसर्गाच्या सपाट्यात शेतकरी होरपळत आहे. त्याचा फटका सूर्यभान खोकले यांनाही बसला. त्यांच्याही शेतात नापिकी होत होती. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. घरगाडा व कर्जाची परतफड कशी करायची या विवंचनेत असलेल्या सखाराम खोकले यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

सागाच्या झाडाला गळफास 

शेवटी शनिवारी (ता. २९) सकाळी ११ ते १२ च्या सुमारास माळझरा शिवारातील एका सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्यांच्या घरच्याना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मनाठा पोलिसांना घटनेची महिती मिळताच त्यांनीही घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी लक्ष्मण राजाराम खोकले यांच्या माहितीवरून मनाठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्या मार्दगर्शनाखाली पोलिस नाईक श्री. तिडके करीत आहेत.

अतिवृष्टीनंतर घटनेत वाढ

जिल्ह्यात २०१९ मध्ये आजपर्यंत १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी - सात, फेब्रुवारी दहा, मार्च दहा, एप्रील तीन, मे १२, जून ११, जुलै ११, ऑगष्ट १३, सप्टेंबर नऊ, ऑक्टोबर सात व नोव्हेंबर १८ तर डिसेंबरमध्ये आठ घटना घडल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या. याच काळात नोव्हेंबरमध्ये आठरा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

सहा वर्षात ८६१ आत्महत्या

सहा वर्षांत ८६१ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यात २०१४ मध्ये ११८, २०१५ मध्ये १९०, २०१६ मध्ये १८०, २०१७ मध्ये १५३, २०१८ मध्ये ९८, २०१९ मध्ये १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षातील १२२ घटना घडल्या. यातील ९९ शेतकरी कुंटूब मदतीसाठी पात्र ठरले आहेत. १२ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरले आहेत. तसेच ११ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT