Accident after falling 25 feet into a ravine Incidents in Hardy 
मराठवाडा

ट्रकवर दुचाकी धडकून बापलेक ठार, जालना जिल्ह्यातील घटना

गजानन ऊदावंत

जखमींना उपचारासाठी तातडीने जालन्याच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे प्रथमोपचार करून औरंगाबादला हालविण्यात आले आहे.

जाफराबाद (जि.जालना) : शहरातून (Jafrabad) माहोराकडे जाताना दुचाकी मालवाहू ट्रकवर धडकल्याने बापलेक ठार झाले, तर गर्भवतीसह तीन वर्षीय बालिका गंभीर जखमी झाले. ही घटना चिंचखेडा फाट्यावर गुरुवारी (ता.२७) दुपारी साडेचार वाजता घडली. जाफराबाद शहरातून माहोरा गावाकडे मदन पांडुरंग शेजुळ (वय ३६ रा.म्हसरुळ), गर्भवती मंदा मदन शेजुळ तसेच आकांक्षा मदन शेजुळ (वय ४ ) आणि तीन वर्षीय मुलगी अनुष्का मदन शेजुळ असे चौघेजण गुरुवारी दुपारी दुचाकीवरून जात होते. तेव्हा चिंचखेडा फाट्यावर त्यांची दुचाकी सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडकली. या अपघातात गंभीर मार लागल्याने दुचाकीस्वार मदन तसेच आकांक्षा हे बापलेक जागीच ठार झाले. तर गर्भवती असलेल्या मंदा व अनुष्का या गंभीर जखमी झाल्या. (Father And Son Died In Truck Two Wheeler Accident)

जखमींना उपचारासाठी तातडीने जालन्याच्या (Jalna) सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे प्रथमोपचार करून औरंगाबादला हालविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रमेश जायभाये, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोठरे, पोलिस हवालदार बी.टी.सहाने यांनी घटनास्थळी मदतकार्य केले, तसेच घटनेचा पंचनामा केला. तर मृत मदन व आकांक्षा यांना ग्रामीण रुग्णालयात हालविण्यात आले. तेथे डॉ.डी.एम.पाटील, डॉ.राऊत, प्रवीण रोटे, विनायक गायकवाड यांनी उत्तरीय तपासणी केली. या घटनेची जाफराबाद पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT