Nikita Nikita
मराठवाडा

बाप हरला, पाच वर्षे हमाली केली, सहा लाख केले होते गोळा

अक्षरशत्रू नरसींग जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना केवळ दोन एकर जमीन आहे

उध्दव दुवे

उजळंब (लातूर): येथील निकिता नरसींग जाधव (वय १९) या विद्यार्थीनीचा दिर्घ आजाराने (ता. २९) मे रोजी लातूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला. हमाली करुन लेकीच्या उपचारासाठी सहा लाख रुपये खर्च करणाऱ्या बापाची एकाकी झुंज अखेर अपयशी ठरली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अक्षरशत्रू नरसींग जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना केवळ दोन एकर जमीन आहे. तीन मुली व एक मुलगा असे चार अपत्य आहेत. त्यापैकी निकिता ही सर्वात मोठी असून गेल्या पाच वर्षापासून तिला 'संधी वात' आजाराने पछाडले होते. लातूर, पुणे येथे तिच्यावर उपचार सुरु होते. अशा परिस्थितीतही निकिताने शिक्षण सोडले नव्हते. इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीने लातूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) इलेक्ट्रीशियन कोर्सला प्रवेश घेतला होता.

चारही मुले शिक्षण घेत आहेत. दोघे आईवडील मजूरी करुन उदरनिर्वाहासह शिक्षण व निकिताचा दवाखाना खर्च भागवत होते. वडील नरसींग जाधव पुणे येथील फ्रुट मार्केट मध्ये हमाली करुन तर आई गावात मोलमजुरी करतात. निकिताचा आजार बरा करण्यासाठी आईवडिलांनी दिलेली झुंज अखेर एकाकी पडली असून निकिताच्या जाण्यानं ते पुरते खचले आहेत. निकिताच्या पश्चात आईवडील, दोन बहिणी, एक भाऊ, आजी, काका आणि काकी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT